esakal | आता बेळगावात होणार रेमडेसिव्हिरचे उत्पादन

बोलून बातमी शोधा

null

आता बेळगावात होणार रेमडेसिव्हिरचे उत्पादन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अडथळे येत आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेने बेळगावात लवकरच रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरु केले जाणार आहे, अशी माहिती खाण व भूगर्भ खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. ते बागलकोटमध्ये पत्रकारांशी बोलत होते. बेळगावात रेमडेसिव्हिरचे उत्पादन घेण्यास परवानगी मिळाल्याने बेळगावसह त्याचा राज्यासह महाराष्ट्रालाही त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो.

ते म्हणाले, मुधोळमधील सतीश घारगे यांना रेमडेसिव्हिरचे उत्पादन केंद्र सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बेळगावातील होनगा औद्योगिक वसाहतीत असलेली घारगे यांची आनंद लाइफ सायन्सेस ही कंपनी रेमडेसिव्हिरचे उत्पादन करणार आहे. येत्या २० ते ३० दिवसात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरवात होईल. यामुळे उत्तर कर्नाटकासह राज्यातील कोरोना रुग्णांसाठी पुरेसे रेमडेसिव्हिर उपलब्ध होणार आहे. औषधांचा तुटवडा भासणार नाही. पुढील महिन्यात प्रकल्प सुरु होईल. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून रेमडेसिव्हिरची टंचाई भासत आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री निराणी यांनी स्पष्ट केले.

Edited By- Archana Banage