सांगलीतील मोक्‍याचे भूखंड भाड्याने; उत्पन्नवाढीसाठी कारभार

 Rented plots of land in Sangli; Management for income generation
Rented plots of land in Sangli; Management for income generation
Updated on

सांगली : उत्पन्नवाढीच्या नावाखाली महापालिकेच्या मालकीचे कोट्यवधींचे भूखंड उपसूचनेच्या नावाखाली विनानिविदा भाड्याने देण्यात आल्या आहेत. माधवनगर रोडवरील आणि कोल्हापूर रोडवरील जकात नाक्‍याच्या जुन्या जागांबरोबरच कुपवाडमधील सुमारे दोन गुंठ्यांचा कोट्यवधी किमतीचा भूखंड नऊ वर्षांच्या मुदतीकरता देण्यात आला आहे. मात्र भाडेपट्टयाने दिलेल्या जागा नऊ वर्षांनी पुन्हा महापालिकेला मिळणार की त्या हडपल्या जाणार हा प्रश्‍न आहे. 

कोरोनापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या महासभेत उपसूचनेद्वारे महापालिकेच्या मालकीचे भूखंड भाड्याने देण्याचा ठराव केले आहे. माधवनगर रोडवरील जकात नाक्‍याच्या जुन्या इमारतीमधील जागा आणि कोल्हापूर रोडवरील जुना जकात नाक्‍याचा पत्राशेड व त्याच्या मागील रिकामी जागा दोन दिव्यांग व्यक्तींना नऊ वर्षे मुदतीने भाड्याने देण्यात आली आहे. ठरावात त्यांचा नावासह उल्लेख आहे. तसेच कुपवाडमधील एका जागेचाही ठरावात उल्लेख आहे. ही जागा शहरातील सुमारे दोन गुंठ्याची मोक्‍याची जागा आहे. मुळात बेडग रोडवरील कचरा डेपो येथे हाडे

साठवण्यासाठी जागा भाड्याने देण्याची मागणी करण्यात आली होती. या विषयावर महासभेत वादळी चर्चा झाली होती. 101 चौ. मी.ची ही रिकामी जागा नऊ वर्षांच्या मुदतीकरिता देण्याचा विषय होता. मात्र सभागृहात हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. याच विषयाच्या अनुषंगाने नगरसेवकांनी उपसूचना दाखल करून महापालिकेच्या जागा भाड्याने देण्याचे ठराव करण्यात आले.

यामध्ये माधवनगर रोडवरील आणि कोल्हापूर रोडवरील महापालिकेच्या जकात नाक्‍याची जुनी इमारत, पत्रा शेड या जागा दिव्यांगांना भाड्याने देण्याचे ठराव करण्यात आले. त्याचबरोबर कुपवाडमधील जागाही एका नगरसेवकाच्या उपसूचनेनुसार भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व जागा विनानिविदा भाड्याने देण्यात आल्याने त्याबद्दल आता नवाच वाद उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

निविदा प्रक्रिया का नाही? 
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रतापसिंह उद्यानाशेजारची जुनी इमारत तसेच विजयनगर रोडवरील पाच गुंठ्यांचा मोकळा भूखंडही नऊ वर्षांच्या भाडेपट्टयाने दिला होता. त्यावर सत्ताधारी भाजपनेच आक्षेप घेतला आहे. पण, या जागांसाठी महापालिका प्रशासनाने ई निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र उत्पन्न वाढीच्या नावाखाली मोक्‍याच्या जागा विनानिविदा थेट नगरसेवकांच्या उपसूचनेनुसार भाड्याने देण्याचा हा प्रकार महापालिकेला आतबट्टयाचा ठरणारा आहे. यावर सत्ताधारी भाजपचे मौन आहे. त्यामुळे थेट ठरावाद्वारे दिलेल्या जागा नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्यात का या संशयाला वाव आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com