पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावत होते. मोफत असलेल्या रांगेतून दर्शन घेण्यासाठी पाच ते सहा तास, तर विशेष रांगेतून दर्शनासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत होता.
बेळगाव : ‘उदं गं, आई उदं’च्या गजर आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करत माघी पौर्णिमेच्या (Maghi Purnima) निमित्ताने रेणुका देवीच्या (Renuka Devi) दर्शनासाठी आठ लाखांवर भाविकांनी सौंदत्ती डोंगरावर (Saundatti Dongar) उपस्थिती लावली. आज यात्रेच्या मुख्य दिवशी सौंदत्ती डोंगर गर्दीने फुलून गेला होता. दर्शनासाठी भाविकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या.