esakal | 'या' तारखेपर्यंत बंद राहणार सौंदत्तीचे रेणूकादेवी मंदिर 
sakal

बोलून बातमी शोधा

Renuka Devi temple Saundatti closed june

उत्तर कर्नाटकाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच महाराष्ट्र, कर्नाटकातील आराध्य दैवत असणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवी (यल्लम्मा) मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

'या' तारखेपर्यंत बंद राहणार सौंदत्तीचे रेणूकादेवी मंदिर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगावः उत्तर कर्नाटकाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच महाराष्ट्र, कर्नाटकातील आराध्य दैवत असणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवी (यल्लम्मा) मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. राज्य शासनाने 8 जूनपासून राज्यातील सर्वच मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला आहे पण, भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून सौंदत्ती यल्लम्मा मंदिराने 30 जूनपर्यंत मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने यापूर्वी 1 जूनपासून मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सौंदत्ती रेणुका मंदिर प्रशासनानेही मंदिर सुरू करण्याची तयारी पूर्ण केली होती मात्र, त्यानंतर शासनाने पुन्हा नवा निर्णय घेऊन राज्यातील सर्वच मंदिरे 8 जूनपासून सुरू करण्याचे आदेश बजावले आहेत. पण, सध्या महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने रेणुका मंदिराचे दरवाजे मात्र शासनाने निर्धारीत केलेल्या तारखेला उघडले जाणार नाहीत. दोन महिने सौंदत्ती मंदिर बंद राहिल्याने मंदिर सुरू होताच भाविकांची होणार असल्याने मंदिर 30 जून रोजी उघडले जाणार आहे. होळी पौर्णिमा वगळता प्रत्येक पौर्णिमेला डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी यात्रेचे स्वरुप येते. पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील भाविकांसह गोवा, आंध्रप्रदेशातील भाविकही देवीच्या दर्शनासाठी येतात. 

मंदिर खुले केल्यास देवीच्या दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने सोशड डिस्टन्सिंगच्या उपाय योजना करण्यासाठी मंदिर प्रशासनाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रातील भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाहीत. तर उत्तर कर्नाटकातील भाविक मात्र देवीच्या दर्शनासाठी येऊ शकतात. पण, याठिकाणी होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टंसिंग राखता येणार नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. या सर्व बाबींचा आढावा घेतला जात असून सध्या तरी मंदिर सुरू केले जाणार नसल्याने देवीच्या दर्शनासाठी आणखी काही दिवस भाविकांना वाट पाहावी लागणार आहे.