निघोजच्या त्या व्यक्तींचे रिपोर्ट आले आणि तेही निगेटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निघोज येथील या चार रुग्णांना त्रास जाणवू लागल्याने नगर येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांचे स्रावाचे नमुने तात्काळ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे रिपोर्ट मिळाले. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे यांनी सांगितले.

पारनेर : निघोज येथील चारही संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली. त्या सर्वांचेच रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने पारनेरकरांनी एकदाच निःस्वास सोडला. दोन दिवसांपूर्वी निघोज येथील चार व्यक्तींना संशयीत म्हणून नगर येथे तपासणीसाठी नेले होते. त्या पार्श्वभूमीवर निघोजसह तालुक्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सोशल मीडियात ते पॉझिटीव्ह असल्याची चर्चा होती. त्यामुळे भीतीने लोकांच्या पोटात गोळा आला होता. परंतु त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निघोज येथील या चार रुग्णांना त्रास जाणवू लागल्याने नगर येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांचे स्रावाचे नमुने तात्काळ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे रिपोर्ट मिळाले. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे यांनी सांगितले.

यामुळे निघोज परिसरासह तालुक्यातील जनतेच्या मनावरील आलेले दडपण दूर झाले आहे. यापुढे सर्वांनी काळजी घेऊन घरातच राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The report of those persons in Nighoj was negative