कोल्हापूर : आधार मशीन जमा करण्याचे फर्मान 

कुंडलिक पाटील
Thursday, 18 July 2019

सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत आहेत. या प्रकाराबाबत पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत आहेत. या प्रकाराबाबत पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात सुमारे 250 अधिकृत महा ई-सेवा केंद्रचालक आहेत. त्यापैकी सुमारे 28 केंद्र विविध कारणांनी बंद आहेत. काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सर्व केंद्र चालकांना केंद्र ग्रामपंचायत अथवा सर्कल ऑफिसमध्ये महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सांगितले होते. त्यांनतर केंद्र चालकांनी ग्रामपंचायत व सर्कल ऑफिसमध्ये संपर्क साधला असता काही कार्यालयात जागा नसल्याचे सांगण्यात आले असून ग्रामपंचायतीकडून काही केंद्र चालकांना जागा शिल्लक नसल्याचे पत्र ही दिले.

काही मोजक्‍या केंद्र चालकांना ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध झाल्याचे समजते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश न देता तोंडी आदेश देऊन सरसकट सर्वांना कोणतेही कारण न सांगता "आधी मशीन जमा करा', नंतर बोलू असे सांगितले आहे. यामुळे सर्व केंद्र चालकांच्या त गोंधळाचे वातावरण आहे. 

केंद्र चालकांना जानेवारी 2019 पासून आधार मानधन मिळालेले नाही. तसेच जिल्ह्यात सुमारे एक लाख लाभार्थी आधार विना वंचित आहेत. शून्य ते पाच वयोगटातील मुलांचे आधार कार्ड काढणे, पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक करावे लागते, त्यानंतर 14 वर्षांनंतर त्या मुलांचे मेंडेटरी बायोमेट्रिक लागते, लग्नानंतर नाव बदलावे लागते, काहींचे बायोमेट्रिक अपडेट झालेले नसते, आधार अध्यायावत नसते अशी कामे प्रलंबित पडत आहेत. पॅन कार्ड काढणे, या कामासाठी केंद्रावर नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज रांग लागत आहे. यातच मशीन जमा केल्यास नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. 

मशीन जमा करून घेतल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. नवीन मशीन देणार त्यांची युजर नाहीत, पुढे महिनाभर काम बंद राहील. निवासी उपजिल्हाधिकरी यांनी युजर क्रिडेंटीयल करून मशीन पूर्ववत सुरू ठेवावीत, अशी आमची मागणी आहे. 
- पिराजी संकपाळ,
जिल्हा अध्यक्ष, महा ई-सेवा केंद्र संघटना

नियमात काम करणाऱ्यांची केंद्र सुरू ठेवावीत, कामाचा लोड आहे, मशीन जमा केल्यास नागरिकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. 

- सागर भोसले ,केंद्र चालक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident Deputy Collector order to Submit Adhar Machin