म्हणून सांगोला तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल 

For resisting three FIR Highway work
For resisting three FIR Highway work

सांगोला (सोलापूर) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाहुबली गवळी, पिंटू यादव व त्याची बहीण या तिघांनी जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीपकुमार सिंग व त्यांच्या साथीदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना दगडफेक करून मारहाण केल्याची घटना वाटंबरे (ता. सांगोला) येथे घडली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा- भक्त निवासाचा लाभ घेतला तीन हजार भाविकांनी
कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

सांगोला तालुक्‍यातून रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याबाबत जी. आर. इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स लिमिटेड कंपनीस 31 डिसेंबर 2018 रोजी काम सुरू करण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. प्रदीपकुमार सिंग, रामपाल पात्रा, प्रिन्स श्रीवास्तव या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संदीप गोडसे, मन्सूर मुलाणी, आकाश आलदर, राजू चौधरी, कोमल चव्हाण, पप्पू यादव, बिजेंदर चौधरी, संजय चौधरी, वशिष्ठ राम, मुन्ना कुमार असे कर्मचारी वाटंबरे (ता. सांगोला) हद्दीतील बाहुबली ज्ञानू गवळी यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर 155 मधून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणचे काम करीत होते. यावेळी बाहुबली ज्ञानू गवळी त्याचा जावई पिंटू यादव आणि यादव यांची बहीण हे तिघेजण येथे आले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तिथून निघून जा नाहीतर तुम्हाला सर्वांना खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली. त्याचबरोबर पिंटू यादव यांनीही माझ्या सासऱ्याच्या जागेवरून निघून जा अन्यथा तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असा सर्वांना दम भरला. 

हेही वाचा- महाविकास आघाडीचे सोलापूर, नगरला पहिले गिफ्ट
कानाखाली चापट

यावेळी सर्वांना तिघे मिळून दगड मारू लागले. पिंटू यादव याने मारलेला दगड प्रदीपकुमार सिंग यांच्या पायाच्या पोटरीवर लागल्याने ते जखमी झाले तर रामपाल पात्रा यांनाही कानाखाली चापट मारल्याने घाबरलेले सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. याबाबत प्रदीपकुमार सिंग यांनी सांगोला पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बाहुबली गवळी, पिंटू यादव व त्याची बहीण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com