इचलकरंजी-सांगली रस्त्याच्या कडेला सेवानिवृत्त अभियंत्याची आत्महत्या

राजेंद्र होळकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुपच्या सदस्यांना शुभ संदेश पाठवून मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर येत असल्याचे सांगून मोटार घेवून घरातून निघून गेले. येथील इचलकरंजी-सांगली रोड कडेला मोटार उभा केली. रस्त्याच्याकडेला उभारलेल्या होर्डिंगच्या लोंखडी दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. 

इचलकरंजी : येथील इचलकरंजी-सांगली रोड कडेला उभारलेल्या होर्डिंगच्या लोंखडी अँगलला राज्य विज वितरण महाकंपनीचा एका सेवानिवृत कनिष्ठ अभियंताने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघकीस आली.

मल्लीकार्जुन दोडामणी (वय ६५, रा. बडबडे हॉस्पिटल शेजारी, महासता चौक, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मृत दोडामणी हे राज्य विज वितरण महाकंपनीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर हातकणंगले तालुक्यातील एका नामवंत कॉलेजमध्ये इलेक्ट्री विभागात प्रमुख म्हणून काम पाहत होते. ते दररोज मॉर्निंग वॉकला जात होते. आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुपच्या सदस्यांना शुभ संदेश पाठवून मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर येत असल्याचे सांगून मोटार घेवून घरातून निघून गेले. येथील इचलकरंजी-सांगली रोड कडेला मोटार उभा केली. रस्त्याच्याकडेला उभारलेल्या होर्डिंगच्या लोंखडी अँगलला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. 

ही घटना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या त्याच्या मित्राच्या निदर्शनास आली. यांची माहीती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानी मृतदेहाचा पंचनामा करुन, मृतदेह शवविवेच्छनासाठी आयजीएम सामान्य हॉस्पीटलमध्ये पाठविला. हॉस्पिटलच्या आवारात मृत दोडामणी याचा नातेवाईक आणि मित्रानी मोठी गर्दी गेली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.

Web Title: Retired engineer hanged himself at ichalkaranji sangali road