शेजारील देवळात काहीवेळ ते बसले अन् अचानकच धबधब्यात उडी टाकली ; निवृत्त प्राध्यापकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

मात्र, अंधार पडल्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबविले.

गोकाक (बेळगाव) : येथील प्रसिद्घ धबधब्यात उडी टाकून निवृत्त प्राध्यापक शिवकांत गुरुपदप्पा कुरबेट (वय ६२, रा. मेलमट्टी) यांनी आत्महत्या केली. यासंबंधी गोकाक शहर पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. कुरबेट बागलकोट येथील बसवेश्वर विद्यावर्धक संघाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते.

सेवानिवृत्तीनंतर ते आठ दिवसांपूर्वी मूळ गावी मेलमट्टीत आले होते. 
दुपारी तीनच्या सुमारास धबधब्याच्या शेजारील देवळात काहीवेळ बसले. त्यानंतर अचानकच धबधब्यात उडी टाकली. मात्र, याचा पाण्यात न पडता ते दगडावर आपटले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र, अंधार पडल्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबविले. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होईल. या घटनेची पोलिसात नोंद 
आहे.

हेही वाचा - अनमोड मार्ग अरूंद असल्याने वाहनचालकांना अंदाज आला नाही

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retired professor attend a suicide in gokak waterfall in belgaum