esakal | त्या बाटलीने केला घात ! परभणीच्या त्या कोरोनाग्रस्ताची भागवली तहान पण..
sakal

बोलून बातमी शोधा

Shopkeepers family made home quarantine

परभणी येथील हा प्रवासी पुणे येथून नगर-पुणे महामार्गाने भर दुपारी प्रवास करत असताना वाटेत त्याला खूप तहान लागली. मात्र, वाटेत कोठेच हॉटेल किंवा दुकान उघडे नसल्याने त्याला पाणी मिळाले नाही.

त्या बाटलीने केला घात ! परभणीच्या त्या कोरोनाग्रस्ताची भागवली तहान पण..

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः आपल्या वाहनामधून एक जण पुणे-नगर महामार्गाने आपल्या घरी परभणीला निघाला होता. वाटेत तहान लागल्याने त्याने सुपे येथील एका किराणा मालाच्या दुकानात पाण्याची बाटली घेतली. पाणी पिल्याने त्याचा जीव शांत झाला. दररोज शेकडो ग्राहक येतात. त्यामुळे तो कस्टमर दुकानदाराच्या विस्मृतीत गेला. मात्र, पुढे वेगळंच वाढून ठेवलं होतं, त्या दुकानदाराच्या नशिबात. 

भोसरी (पुणे ) येथे नोकरीस व रहात असले गृहस्थ 12 एप्रिलला भोसरी येथून आपल्या मूळ गावी परभणीस गेला. तो 20 एप्रिलला पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले अन सारी सरकारी यंत्रणा कामाला लागली. तो कोणत्या मार्गाने आला, कोठे थांबला व वाटेत काही घेतलं का. याचा शोध सुरू झाला. त्या वेळी तो सुपे येथे थांबून किराणा मालाच्या दुकानातून एक पाण्याची बाटली घेतल्याचे सांगितलं. 

हेही वाचा - या कारणाने राहिले नगरचे मार्केट बंद

पारनेरचा आरोग्य विभाग, महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी त्या दुकानाचा शोध घेतला. त्या दुकान चालकासह त्याच्या घरातील तीन पुरूष आणि दोन महिलांना 14 दिवसांसाठी आता होमकोरंटाईन करण्यात आले आहे. ते दुकानही 14 दिवसांसाठी बंद केले आहे.

परभणी येथील हा प्रवासी पुणे येथून नगर-पुणे महामार्गाने भर दुपारी प्रवास करत असताना वाटेत त्याला खूप तहान लागली. मात्र, वाटेत कोठेच हॉटेल किंवा दुकान उघडे नसल्याने त्याला पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी त्याचा जीव  कासाविस झाला कधी एकदाचे पाणी पितो असे झाले असतानाच त्यांने शिरूरही सोडले शेवटी सुपे येथे आला असताना त्यास एक किराणा मालाचे दुकान उघडे दिसले. त्याला हायसे वाटले. त्याने पाण्याची एक बाटली विकत घेतली. 
त्या एका बाटलीने परभणीकराची तहान भागली. मात्र आता दुकानदाराच्या घशाला कोरड पडली आहे. त्याच्यासह  घरातील चारजणांना  होमक्वॉरंटाईन केल्याने व 14 दिवस दुकानही बंद केल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्या बरोबरच या दुकानात खरेदी केलेल्यां लोकांचेही धाबे दणाणले आहे. आपल्याला लागण तर झाली नसेल ना अशी चिंता त्यांना सतावते आहे.