
सांगली : येथील विजयनगरला जिल्हा न्यायालयाच्या दारातच रिक्षावाले एकमेकाला भिडले. या अनधिकृत थांब्यावर प्रवासी घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना धक्काबुक्की केली. काहींनी डायलॉगबाजी करत बघून घेण्याचा दम दिला. रिक्षाचालकांमधील हद्दीचा वाद वाढत निघाला आहे. वाहतूक पोलिसांच्या खांद्यावर हात ठेवून रिक्षावाले आता कायद्याला आव्हान देऊ पाहत आहेत.