बलात्काऱ्यांना आता होणार दोन महिन्यात शिक्षा

satej patil speech in kolhapur ujalaiwadi
satej patil speech in kolhapur ujalaiwadi
Updated on

उजळाईवाडी (कोल्हापूर) : आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धरतीवर महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांना प्रतिबंध घारण्यासाठी नवीन कायदा करणार आहे. बलात्काऱ्यांना दोन महिन्यात शिक्षा होण्याची तरतूद या कायद्यामध्ये असेल. त्याच बरोबर संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना मुलांच्या चोवीस वर्षांनंतरही पेन्शन सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. 

उजळाईवाडी येथील गृहदामिनी महोत्सवात मंत्री पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, पेन्शनसाठी उत्पन्नाची मर्यादा २१ हजारा वरून ५१ हजार करण्याचे प्रस्तावित असून यासंबंधी लवकरच निर्णय होईल. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटवण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने येथील समस्याही सोडवल्या जातील. 

अध्यक्षस्थानी प्रमात्मराज महाराज होते.  यावेळी प्रमुख्य मान्यवरांच्या हस्ते  एस. फोर इ गौरव पुरस्कार वसंतराव मुळीक, संजय सातव, भरत खराटे, प्रशांत मंडलिक, रमेश मोरे, मेहबूब तहसीलदार, रौनक शहा,  महेश मच्छले, सदाशिव पाटील, मदन पाटील,तर गृह दामिनी पुरस्कार राणी पाटील, अनुराधा भोसले, मनीषा वासकर, डॉ.उज्वला पदकी, डॉ. रेश्मा पवार, डॉ. दीपा पाटील, प्राजक्ता देशपांडे, रतन मालेकर, नेत्रदीपा पाटील, शिल्पा सुतार यांचा सन्मान करण्यात आला.


 या कार्यक्रमासासाठी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, प्रतिमा पाटील, श्रीनिवास माने, एस. फोर. ए. औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा अरुनिमा माने, अवनी माने, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

प्रास्ताविक अरुणिमा माने व सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केले. ताज मुल्लानी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Danevadi Ghat illegal racing police action
Why are tourists unhappy at Panhala Fort?
Kolhapur Nerli bullock cart race results
Tushar Prabhakar Patil death news
Marathi News Esakal
www.esakal.com