चंद्रभागा नदीत कोसळला मालट्रक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

अंधार झाल्यामुळे शोधकार्यात अडचण आली. ट्रक कोणत्या गावाहून कुठे निघाला होता, त्यामध्ये काय माल होता याविषयीची माहिती समजू शकलेली नाही. 

पंढरपूर : येथील अहिल्या पुलावरून भरधाव वेगातील एक मालट्रक नदीत कोसळला. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ट्रकमध्ये चालक आणि त्याचा सहकारी असे दोघेजण असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

अहिल्या पुलावरून एक ट्रक पंढरपूरकडे येत होता. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून पुलाचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे तातडीने घटनास्थळी पोचले.

स्थानिक कोळी बांधवांच्या सहकाऱ्यांनी त्यांनी शोधमोहीम सुरू केली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्याविषयी सूचना दिल्या. अंधार झाल्यामुळे शोधकार्यात अडचण आली. ट्रक कोणत्या गावाहून कुठे निघाला होता, त्यामध्ये काय माल होता याविषयीची माहिती समजू शकलेली नाही. 

तीन महिन्यांपूर्वीही अशीच घटना 
तीन महिन्यांपूर्वी दुधाचा एक टॅंकर याच पुलावरून नदीत कोसळला होता. नदीपात्रात जादा पाणी असल्यामुळे हा टॅंकर बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. आठ दिवसांपूर्वीच हा टॅंकर बाहेर काढण्यात आला होता आणि आज पुन्हा दुसरा ट्रक त्याच ठिकाणी कोसळला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river track collapsed