esakal | मिरज शासकीय कोविड रुग्णालयातून पळून गेलेला दरोडेखोर अखेर जरेबंद
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज शासकीय कोविड रुग्णालयातून पळून गेलेला दरोडेखोर अखेर जरेबंद

मिरज शासकीय कोविड रुग्णालयातून पळून गेलेला दरोडेखोर अखेर जरेबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : येथील शासकीय कोव्हीड रुग्णालयातुन (covid 19) पळालेल्या आनंदा रामा काळे (Aanada kale) या दरोड्यातील संशयितास मिरज (Miraj) ग्रामीण पोलिसांनी केवळ चोविस तासात अटक केली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातीला प्रविण वाघमोडे या पोलिस कर्मचा-याने आनंदा काळे याला मिरज शहरापासुन केवळ दोन किलोमीटर अंतरावरील बोलवाड गावात त्याच्या नातेवाईकाकडेच झोपलेल्या अवस्थेत पकडले. पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे विशेष अभिनदंन केले आहे. (robber-arrested-from-miraj-government-covid-hospital-sangli-crime-marathi-news)

बुधवारी ( ता. 7) रोजी मिरज शासकीय कोव्हीड रुग्णालयातुन आनंदा रामा काळे या दरोड्यातील संशयिताने पलायन केले.आनंदा काळे हा दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित म्हणुन सांगली कारागृहात होता.त्याला कोरोना झाल्याने मिरजेच्या शासकीय कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथुन त्यांने बुधवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास पलायन केले.

हेही वाचा- नव्या सत्ताधाऱ्यांची दीड महिन्यातच वचनपूर्ती; आठ कोटी दूध उत्पादकांच्या खिशात

आनंदा काळे हा काही महिन्यांपुर्वी मिरज पंढरपुर रस्त्यावरील एका दरोड्यासह 2014 मधील एका घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आहे.त्याने रुग्णालयातुन पलायन केल्याने पोलिस यंत्रणाही ब-यापैकी हादरली. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने विशेष पथके नियुक्त करुन शोधमोहिम राबविली.परंतु आनंदा काळे या संशयिताची सगळी माहिती प्रविण वाघमोडे या मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचा-यास असल्याने त्यांने तातडीने त्याच्या नातेवाईकांकडे शोधमोहिम राबविली. आनंदा काळे हा रुग्णालयातुन पळाल्यानतंर मिरजपासुन जवळच असलेल्या त्याच्या नातेवाईकांकडे गेला आणि तेथेच मुक्कामास राहिला.तो तेथे गेल्याचे समजताच त्याला झोपेतच प्रविण वाघमोडे यांने पकडले आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आणुऩ पुन्हा अटक केली.

loading image