esakal | गोडी ‘गोकुळ’च्या दुधाची : दूध उत्पादकांच्या खिशात आता आठ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

गोडी ‘गोकुळ’च्या दुधाची : उत्पादकांच्या खिशात आता आठ कोटी

गोडी ‘गोकुळ’च्या दुधाची : उत्पादकांच्या खिशात आता आठ कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (Gokul dudha sangha)संघाच्या (गोकुळ) मेमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात उत्पादकांना दरवाढीचे दिलेले आश्‍वासन नव्या सत्ताधाऱ्यांनी दीड महिन्यातच पूर्ण केले. ‘गोकुळ’च्या दूध दरवाढीने महिन्याला अतिरिक्त सरासरी आठ कोटी रुपये दूध उत्पादकांच्या खिशात जाणार आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील (satej patil,hasan mushrif) यांनी काल (ता. ९) दूध दरवाढ जाहीर केली. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांत समाधान आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही या निर्णयाने चालना मिळणार आहे. satej-pati-hasan-mushrif-milk-disigen-gokul-dudh-sangha-update-kolhapur-news

‘गोकुळ’मध्ये सत्ता बदलानंतर मुश्रीफ, पालकमंत्री पाटील यांच्यासह नेत्यांच्या उपस्थितीत २० लाख लिटर संकलन कलशाचे पूजन झाले. याआधीच्या सत्ताधाऱ्यां‍नी गोकुळचे दररोजचे दूध संकलन २० लाख लिटर करायचे, हे गृहीत धरून आराखडा तयार केला होता. प्रत्यक्षात संकलन वाढ झालीच नाही. येत्या चार वर्षांच्या काळात वर्षाकाठी सरासरी दोन लाख लिटर दूध संकलनाची वाढीचे नियोजन आहे. प्रत्यक्षात ही संकल्पपूर्ती येत्या दोन ते अडीच वर्षातच होईल, असा विश्‍वास आहे. त्यानुसार प्रत्येक सुपरवायझरला साधारणता ५०० लिटर दूधवाढीचे उद्दिष्ट दिले आहे.

हेही वाचा- माणुसकीचं दर्शन! तब्बल शेकडो बेवारस मृतदेहांवर सुप्रियाकडून अंत्यसंस्कारमाणुसकीचं दर्शन!

काटकसरीचा कारभार सुरू

मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी अवलंबलेले काटकसर आणि बचतीचे धोरणही दूध उत्पादकांना न्याय देणारेच आहेत. यामध्ये स्वच्छतेच्या ठेक्यासह टँकर वाहतुकीत ५ कोटी ३० लाखाची बचत, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे ३ कोटीची बचत, पशुखाद्य वाहतुकीत २ कोटींची बचत तर मुंबईच्या दूध पॅकिंगमध्ये १ कोटी २५ लाख रुपये, दूध संकलनमध्ये १ कोटी, पशु औषधोपचार यामध्ये ४८ लाख व गोचीड ताप निर्मूलनात सात लाख अशी एकूण १६ ते १८ कोटी रुपये वार्षिक बचत अपेक्षित धरली आहे व त्यानुसार कामकाज सुरू आहे.

गोडी ‘गोकुळ’च्या दुधाची

मुंबई शहर आणि उपनगरातील दूध विक्रेत्यांचा हा अनुभव आहे की, गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. लहान मुलांना तर या दुधाची एवढी गोडी आहे की, जर त्याला गोकुळ दुधाची सवय लागली असेल. अर्थात हे श्रेय कुणा नेते किंवा संचालक मंडळाचे नसून रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून अहोरात्र राबणाऱ्या या शेतकऱ्यांचे आहे. कारण, दूध संघाला सकस, निर्भेळ आणि दर्जेदार दूध शेतकरी प्रामाणिकपणे पुरवठा करीत आहेत. तसेच या जिल्ह्याचे पाणी, माती आणि वैरणीतही तो गुण असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

loading image