esakal | दरोडेखोरांना आदिवासी महिलेच्या मुलीवर करायचा होता अत्याचार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME RAPE

महिला व तिच्या मुली तेथे राहतात. आज पहाटे सात  दरोडेखोर तेथे आले. बाहेरच झोपलेल्या त्या महिलेल्या अंगावर तलवारीने वार करुन तिच्या अंगावरील दागिने हिसकावले. घरातील सामानाची उचकापाचक करुन निघून गेले. त्यांचा शोध घेवू लागले.

दरोडेखोरांना आदिवासी महिलेच्या मुलीवर करायचा होता अत्याचार पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. यात महिलेवर तलवारीने वार केला आहे. दरोडेखोर दुसऱ्याच उद्देशाने घरी आले होते. त्यांना माझ्या मुलीवर अत्याचार करायचा होता, असे जखमी महिलेचे म्हणणे आहे. 

घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपअधीक्षक संजय सातव यांनी पहाटेच भेट दिली. याबाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  मात्र समजलेल्या माहितीनूसार भोळेवस्ती येथे एक आदिवासी समाजातील कुटूंब आहे.

महिला व तिच्या मुली तेथे राहतात. आज पहाटे सात  दरोडेखोर तेथे आले. बाहेरच झोपलेल्या त्या महिलेल्या अंगावर तलवारीने वार करुन तिच्या अंगावरील दागिने हिसकावले. घरातील सामानाची उचकापाचक करुन निघून गेले. झटापटीत दरोडेखोरांनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेत तिच्यावर तलवारीचा वार करुन जखमी केले.
दरोडेखोर त्या मुलींवर अत्याचार करण्याच्या तयारीने आले होते, असे त्या जखमी महिलेने पोलिसांकडे दावा केला आहे. मात्र त्याबाबत नोंदविलेल्या गुन्ह्यात उल्लेख नसून पोलिस तपास करीत आहेत. 

संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार दहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतरच खरा प्रकार समोर येईल.

loading image
go to top