
पलूस : पलूस (सांडगेवाडी) येथील सूर्यवंशी हायटेक ॲग्रो एजन्सीचे मालक संदीप रामचंद्र सूर्यवंशी (वय ४०, रा. येळावी, ता. तासगाव) यांच्यावर रविवारी (ता. ३) रात्री दुकान बंद करून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी रोकड लुटीच्या उद्देशाने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यापैकी एकास जागेवर तर एकास वांगी (ता. कडेगाव) येथून पलूस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.