जत: मुचंडी ते गुड्डापूर मार्गावर अज्ञात चार चोरट्यांनी पिकअप गाडी अडवून चालकास मारहाण करत गाडीसह रोख वीस हजार, असा पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. मंगळवारी (ता. १२ ऑगस्ट रोजी रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात चालक प्रमोद विलास काशीद (वय ३०, रा. निगडी खुर्द, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे.