पेठवडगाव वारणा बझारमध्ये चोरी; सुमारे वीस लाख लंपास

पेठवडगाव वारणा बझारमध्ये चोरी; सुमारे वीस लाख लंपास
Updated on

पेठवडगांव - येथील वारणा बझारमध्ये अज्ञात चोरांनी लॉकर फोडुन सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम चोरुन नेले आहेत. चार वॉचमन असताना सुध्दा ही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

वडगांव - लाटवडे रोडवर वारणा बझारची शाखा आहे. शनिवार व रविवारी बॅकांना सुट्टी असल्यामुळे जवळपासच्या बारा शाखांची रक्कम वडगांव शाखेतील दोन लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. दिपावलीमुळे खरेदीसाठी गर्दी असल्याने मोठी रक्कम होती. या शाखेतील तळमजल्यावर एक व पहिल्या मजल्यावर एक लॉकर आहे. यातील तळमजल्याच्या लॉकरमध्ये काही रक्कम ठेवल्यानंतर त्यामध्ये बसत नसल्यामुळे पहिल्या मजल्यावरील लॉकरमध्ये सुमारे बावीस लाख रुपये ठेवले होते. अज्ञात चोरांनी शाखेच्या पाठीमागच्या बाजुने पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. एक सेंटीमीटर जाड असणारी लॉकर ग्राइंडरने कापून सुमारे वीस लाख रुपये चोरुन नेले. या लॉकरचे कुलुप निघाले नाही. परंतु दाराचा पतरा कापल्यामुळे एक फट तयार झाली. यामधुन ही चोरी केली. पण आतील अडीच लाख रुपये त्यांना काढता आले नाहीत. घटनास्थळी लॉकर कापल्याने लोखंडाची भुकटी सर्वत्र पडली होती.

चोरांनी चोरीची रेकी केली असावी. त्यांना दोन दिवसांची रक्कम कुठे असते हे माहीत होते. हा बझार रात्री आठच्या सुमारास बंद होतो. त्यानंतर नऊ वाजता कुलपे घातल्यानंतर किल्या अधिकाऱ्यांच्याकडे असतात. परंतु रात्रभर सभोवताली टेहळणीसाठी चार वॉचमन असतात असे असताना सुध्दा चोरी कशी झाली याबद्दल अाश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

लॉकर तोडताना वॉचमनला अावाज आला पाहिजे होता, तसे झाले नाही. यामुळे घटनेचे गुढ वाढले आहे. याबाबत पेठवडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन तपास पोलिस निरीक्षक प्रदिप काळे करीत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

bribery case in Sangli district
Maharashtra Sugar Market
Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Marathi News Esakal
www.esakal.com