Rohit Pawar again a helping hand
Rohit Pawar again a helping hand

रोहित पवारांकडून पुन्हा मदतीचा हात, जामखेडमधील पंधरा हजार कुटुंबाला पुरवला कांदा-बटाटा

जामखेड: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढल्याने कर्जत-जामखेड आमदार रोहित पवारांकडून पुन्हा 'मदतीचा हात' पुढे करण्यात आला आहे. कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यातील तब्बल १५ हजार कुटुंबांना ४ ट्रक कांदा-बटाटा (ता.१९ रोजी) पोहोच करण्यात आला आहे.

यामध्ये २ ट्रक कर्जतसाठी व २ ट्रक जामखेडसाठी असा सामावेश आहे. मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमिहिन मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलोग्रॅम कांदा व एक किलोग्रॅम बटाटा तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गरजुंना पोहोच करण्यात येणार आहे.

हे वाटप करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा, गर्दी होऊ नये, कसल्याही प्रकारचा दिखावा होऊ नये म्हणुन ही मदत प्रशासनाच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या मदतकार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. मागील आठवड्यातही आमदार रोहित पवार यांनी आपल्या दातृत्वातुन मतदारसंघात सुमारे पाच ट्रक गहू आणि डाळ असे धान्य पोहोच करून गरीब कुटुंबाची काही दिवसांची भुक भागवली आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ता.३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे गोर-गरीब कुटुंबांना,मोलमजुरांना आ.पवार यांनी मदतीचा हात दिला आहे. संकटकाळात मतदारसंघातील कुणावरही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी विशेष 'वॉच' ठेवणाऱ्या आमदार पवारांनी आरोग्याची काळजी घेत मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण राज्यभर सॅनिटायझरचे वाटप करून त्यांनी सुरू केलेल्या 'कोरोनाशी लढुना' या मोहिमेत आपले मोलाचे योगदान दिले आहे.

भुमीपुत्रांनी मदतकार्यात योगदान द्यावे

कर्जत-जामखेडमधील भूमिपुत्र परंतु नोकरीनिमित्त बाहेर असलेल्यांनी मदतकार्यात आपले योगदान द्यावे.आणि प्रशासनाकडे आपणास जमेल ती मदत सुपूर्द करून मदतकार्य करावे.आता ही वेळ एकमेकांना मदत करून खरा मानवधर्म निभावण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com