esakal | रोहित पवार का म्हणाले, भाजपवाल्यांनो आता तरी सुधरा
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar criticizes BJP

राज्यासमोर आता कठीण वेळ आहे. भाजपने आता राजकारण सोडून समाजकारण करावे, असे असा सल्ला देतानाही ते दिसतात.

रोहित पवार का म्हणाले, भाजपवाल्यांनो आता तरी सुधरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधी पक्षाकडून केवळ राजकारण केले जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तशी टीका होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट राज्यपालांनाच टार्गेट केलं. या राजकारणाबद्दल राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार वारंवार टि्वट करत असतात. कालही त्यांनी ट्विट करून भाजप नेत्यांवर शरसंधान साधले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाटेत कायदेशीर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाचे संकट उभे राहिले असतानाही भाजप नेत्यांना राजकारण सुचते आहे. किमान या आणीबाणीच्या काळात तरी सर्व पक्षांनी एकजुटीने लढा द्यायला हवा होता. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही टिपण्णी करीत आहेत. मात्र, रोहित पवार यांनी थेटपणे भाजप नेत्यांच्या राजकारणावर कोरडे ओढले आहेत.

राज्य कोरनाशी लढत आहे अन भाजप नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात. तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टाने त्यांचा स्वप्नभंग केला आहे. आता तरी त्यांनी सुधारलं पाहिजे. एका बाजूला भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता आहे, अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

भाजप नेत्यांकडून सरकारला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो. मुख्यमंत्री यांना कोणत्याच सभागृहाचे सदस्य मिळू नये यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. त्यावेळीही रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणाच्या पद्धतीवर टीका केली होती. कधी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर देताना दिसतात.

राज्यासमोर आता कठीण वेळ आहे. भाजपने आता राजकारण सोडून समाजकारण करावे, असे असा सल्ला देतानाही ते दिसतात.