विजयानंतर रोहित पवार राम शिंदे यांच्या घरी; घेतले आईचे दर्शन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात झालेल्या लढतीत अखेर रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा तब्बल 42 हजार मतांनी पराभव केला आहे. 

नगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात झालेल्या लढतीत अखेर रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा तब्बल 42 हजार मतांनी पराभव केला आहे. 

रोहित पवार यांनी आज (ता. 24)  सायंकाळी चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी फेटा बांधून पवार यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्ते होते. तेथून पवार हे पालकमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे पालकमंत्री शिंदे यांच्या आईचे दर्शनही घेतले.

 

त्यानंतर शिंदे यांनी पवार यांचे अभिनंदन करीत फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. रोहित पवार हे शिंदे यांच्या घरी येताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रोहित पवार यांनी राजकीय परिपक्वता दाखवल्याची चर्चा यावरून सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar Meet Ram Shinde After Win VidhanSabha Election