esakal | VIDEO: रोहितदादाक काळजी रे... पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची भागवताहेत भूक
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar's Free Meal for Pune Students

ती गैरसोय ओळखून आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या  "सृजन  फाउंडेशन" व "MPSC STUDENTS RIGHTS" या संस्थांच्या माध्यमातून या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. या विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण देण्याची संकल्पना पुढे आली.

VIDEO: रोहितदादाक काळजी रे... पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची भागवताहेत भूक

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता  पुणे येथे वास्तव्यास असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाबरोबरच राज्याच्या विविध भागातील साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून 'सृजन फाउंडेशन' व एमपीएससी  स्टुडन्ट राइट्स या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांपासून मोफत भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अडकलेल्या विद्यार्थ्यांना आधार

पुण्यात  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे अनेकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्या आडचणीवर मात करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी दाखवलेला पुढाकार आदर्श ठरतो आहे.

राज्याच्या विविध भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकून पडण्याची वेळ आली. त्यांना आपल्या गावाकडे परतता येत नाही, तसेच त्यांच्यासाठी येथे मिळणाऱ्या सुविधा ही बंद झालेले आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण त्यांच्या जेवणाच्या खानावळी बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर दोन वेळच्या जेवणाची मोठी गैरसोय निर्माण झालेली होती.

ती गैरसोय ओळखून आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या  "सृजन  फाउंडेशन" व "MPSC STUDENTS RIGHTS" या संस्थांच्या माध्यमातून या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. या विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण देण्याची संकल्पना पुढे आली.

दोन वेळा जेवण

मागील तीन दिवसापासून त्यांनी मोफत जेवण व्यवस्था सुरू केली आहे. याकरिता पुण्यातील काही महत्त्वाच्या 20 ठिकाण त्यांनी निवडली. तसेच जेवणाची वेळही निश्चित केली. विशिष्ट वेळेतच हे जेवण या विद्यार्थ्यांना पुरविले जाते. दुपारी 1.00 ते 1.30  व सायंकाळी 8.00 ते 8.30 या वेळेत जेवण देण्यात येत आहे.

दररोज आठशेजणांना जेवण

दररोज 750-800 विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था  केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पुलाव, पुरी- भाजी, भात-वरण, उपमा इत्यादी. जेवण दिले जात आहे. सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे पालन करीत आहेत. पस्तीस जणांची टीम यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे.
‌‌ पुण्यातील काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वजण एकत्रित येऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जेवण पोहोचवीत आहेत.

अंजन घालणारा उपक्रम
आमदार रोहित पवार यांनी पुण्यात सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील अन्य प्रतिनिधींसाठी डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. त्यांनीही अन्य जिल्ह्यांमध्ये ही अशाच पद्धतीने अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर लोकप्रतिनिधींनी सुरू केल्यास त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण नक्कीच दूर होईल.