गुलाब ४० रूपये डझन, तर झेंडू ८० रूपये किलो

रवींद्र माने
रविवार, 25 ऑगस्ट 2019

तासगाव - सांगली जिल्ह्यात आलेला महापूर आणि पावसामुळे फुलांचे ‘शॉर्टेज’ झाले आहे. मुंबई मार्केटमध्ये गुलाब ४० रुपये डझन तर झेंडू किलोला थेट ८० रुपयांवर पोहोचला आहे. फुलांचे दर वाढले असले तरी पिकाचे नुकसान झाल्याने फुलशेती अडचणीत; मात्र फुलांचे दर वाढलेले, अशी  स्थिती बाजारात अनुभवण्यास येत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुंबई मार्केटमध्ये गुलाब आणि झेंडू जातो.

दरवर्षी श्रावण आणि गणपती उत्सवासाठी फुल शेतकरी नियोजन करत असतो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. महापुरामुळे नदीकाठच्या फुलांची शेती पाण्याखाली गेली आणि नदीकाठी नसलेल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना सलग पंधरा वीस दिवस पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला आहे.

परिणामी फुलांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मुंबई मार्केट मध्ये झेंडूच्या फुलाला ३० ते ४० रुपयांवरून ८० ते १०० रुपये किलो असा दर मिळू लागला आहे. तर गुलाबाला १२ रुपयांवरून ४० रुपये डझन असा भाव मिळू लागला आहे. उत्पादन कमी मात्र मागणी वाढल्याने फुलांचे भाव कडाडले आहेत. दुर्दैवाने वाढलेल्या दराचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील दीड-दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.

सलग पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे  फूल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने दर वाढलेले दिसत आहेत; मात्र दुसरीकडे ऐन सुगीत उत्पादन कमालीचे घटल्याने फुलशेती अडचणीत आली आहे. 
- उल्हास मिरजकर,
फुलशेती तज्ज्ञ

डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव
दरवर्षी श्रावण आणि गणेशोत्सव हे फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. या काळात फुलांना प्रचंड मागणी असते. फुलांचे दरही तेजीत असतात. तशी आवकही खूप असते; मात्र पावसाने गुलाब आणि झेंडूवर आलेल्या डाऊनी व बुरशीजन्य रोगामुळे उत्पादन घटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rose 40 Rs. dozen Marigold 80 Rs Kg