

RPI Seat Demand
sakal
सांगली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय घटक पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत रिपाइं (आठवले) पक्षाला पाच ते सहा जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आज येथे ते पत्रकारांशी ते बोलत होते.