Belgaum : अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीत घट, शिक्षण खात्याची चिंता वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum : अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीत घट, शिक्षण खात्याची चिंता वाढली

Belgaum : अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीत घट, शिक्षण खात्याची चिंता वाढली

बेळगाव : विद्यार्थ्यांची अपहरण होत असल्याचे अफवा मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने बेळगाव जिल्हासह राज्यातील शाळांमधिल विद्यार्थ्यांच्या हजेरीवर मोठा परिणाम होऊ लागला असून शिक्षण खात्याच्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसात विविध शाळांमध्ये दहा ते वीस टक्के विद्यार्थी गैरजर होऊ लागले आहेत. त्यामुळे शाळांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.

दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यामुळे शिक्षण खात्याने यावर्षी लवकर शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या महिन्यापूर्वी लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे व्हिडिओ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर काही गावांमध्ये संशयित फिरत असल्याची चर्चा देखिल एकावयास मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये व विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण होत आहे.

हेही वाचा: Vastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..

काही पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून देणे बंद केले आहे. त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दररोज विद्यार्थ्यांची हजेरी देण्याची सूचना सर्व शाळाना केली असून ज्या ठिकाणी विद्यार्थी गैर हजर राहीत आहेत. त्या ठिकाणी जनजागृती करण्याची सूचना देखील गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा किंवा राज्यात मुलांचे अपहरण झाल्याची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून देणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.

गेल्या एक महिन्यापासून विविध भागातील गावांमध्ये विद्यार्थ्यांना पळून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे काम देखील हाती घेतले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील सातत्याने प्रशासनातर्फे केले जात आहे. तरीही पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा: मनगटावरचे घड्याळही नशीब बदलेल; हातात घालण्याचीही आहे पद्धत, पहा कशी?

"शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पालकांनी कोणत्याही प्रकारची अफवांवर विश्वास ठेवू नये. ग्रामीण भागात अधिक प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. अशी माहिती मिळाली आहे."

- रवि बजंत्री, शहर गट शिक्षणाधिकारी