सौन्दत्ती मंदिर चालू होण्याची अफवा खोटी ; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण |Belgaum | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saundatti temple

सौन्दत्ती मंदिर चालू होण्याची अफवा खोटी ; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण

बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिर १ फेब्रुवारीपासून खुले होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत सौंदती मंदिराचे सीईओ रवी कोटारगस्ती यांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सौंदत्ती रेणुका देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर मात्र देवीचे दर्शन भाविकांना खुले होणार असल्याची खोटी माहिती पसरली आहे. अद्याप असा कोणत्याही प्रकारचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. पण तरीही काहीनी ही खोटी माहिती पसरवली आहे. त्यामुळे अखेर मंदिराकडून याबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. १७ जानेवारी रोजी सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा होती. ती देखील रद्द करण्यात आली. पण तरी देखील भाविक अजूनही सौंदत्ती डोंगराकडे देवीच्या दर्शनासाठी म्हणून रवाना होत आहेत. पण त्यांना दर्शन मिळत नसून डोंगराच्या पायथ्याशी सामूहिक पडली भरून लोक माघारी परतत आहेत.

हेही वाचा: नसरापूर मधील मुख्य रस्त्याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

फेब्रुवारी महिन्यात देखील पौर्णिमेला सौंदत्ती देवीची यात्रा होणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता फेब्रुवारी महिन्यात देखील देवीचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता नाही. बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरच देवीचे दर्शन खुले होणार आहे. पण सध्या जिल्ह्यातील करण्याची स्थिती पाहता मंदिर दर्शनासाठी खुले करणे धोक्याचे आहे. कारण मंदिर खुले झाल्यास यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक याठिकाणी एकत्र जमण्याची भीती आहे. त्यामुळे सद्या मंदिर खुले करण्याचा कोणताही विचार प्रशासनासमोर नाही.

हेही वाचा: कुऱ्हाडीने हल्ला करून सासूचा खून

सोशल मीडियावर काहींनी रेणुका देवी मंदिर १ फेब्रुवारी पासून खुले होणार असल्याची खोटी।माहिती प्रसविली आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.

-रवी कोटारगस्ती, सीईओ रेणुका देवी मंदिर

Web Title: Rumors Of Saundatti Temple Being Turned Out Are Falseexplanation From The Temple Administration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top