अंधश्रद्धेचा कळस ; घरासमोर तांब्या ठेवा, कोरोना दूर जाईल !

rumors of superstition in belgaum
rumors of superstition in belgaum

बेळगाव : अंधश्रध्देचे विविध प्रकार ठिकठिकाणी पहावयास मिळत असतात मात्र आता कोरोनाला दूर पळविण्यासाठीच्या अंधश्रद्धेने कळस गाठला आहे.  5 घरातून पाणी मागून आणा आणि ते पाणी तांब्यात भरून दरवाजा समोर ठेवा अशी अफवा पसरविली आणि बेळगाव तालुक्‍यातील काही गावात घरासमोर तांबे दिसून लागले आहेत. मात्र अशा अफवांपासून दूर राहण्याची गरज असून कोरोनापासून बचावासाठी घरी राहने हा एकमेव पर्याय आहे हे समजून घेतले पाहिजे.
 
केंद्र व राज्य सरकार कोरोनावर अंकुश घालण्यासाठी आवश्‍यक ती पावले उजलीत आहे. तसेच रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून सर्वत्र योग्य सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र याला हरताळ फासण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. कोरोनाच्या नावावर अंधश्रद्धेचा कळस एका गावात स्पष्टपणे दिसून येत आहे. एका व्यक्‍तीने 5 घरातून पाणी मागून आणून ते पाणी तांब्यात भरून दरवाजा समोर ठेवावे त्यामध्ये तुळशीपत्र, हळद कुंकू, रांगोळी घालून पूजा करून कोरोना जाण्यासाठी साकडे घाला, त्यामुळे कोरोना येत नाही, असे सांगितले आणि बेळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावभर रांगोळी घालून तांबे ठेवल्याचे दिसून येऊ लागले. इतर गावातही तांबे ठेवले जाऊ लागले आहेत. मात्र कोरोनाच्या नावावर सुरु असलेला अंधश्रद्धेचा कळस वेळीच रोखने आवश्‍यक आहे. 

पाच घरातून पाणी मागून आणा आणि तांबे ठेवा असे सांगने हा प्रकार संचारबंदी मोडण्याचा आणि सामाजिक जवळीक साधण्याचा प्रकार आहे. तसेच पाच घरात पाणी आणण्याची आपण साखळी तयार केली तर ही कोरोनाच्या प्रसाराची साखळी होणार आहे. त्यामुळे असे प्रकार करून स्वतःच्या परिवारासह इतरानांही त्रास ठरणार आहे. याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी भीतीपोटी अंधश्रद्धेचा बाजार मांडून कोरोनाचा प्रसार वाढवू नये तसेच प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार वेळीच थांबवावेत अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com