जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हवे आहेत. चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्यातील कोथरूडचे आमदार आहेत.
सांगली : महायुतीच्या सत्तेतील मंत्री निश्चित झाले. त्यांची खाती निश्चित झाली, मात्र अद्याप पालकमंत्री ठरवणे बाकी आहे. सांगली (Sangli) जिल्ह्याला मंत्रिपदच नसल्याने पालकमंत्रिपदासाठी उसनवारीवर भिस्त आहे. अशावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. राज्य शासनाने पंतप्रधान कार्यालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रॉपर्टी कार्ड वितरण सोहळ्याची सांगली जिल्ह्याची जबाबदारी गोरे यांच्यावर सोपवली होती. गोरेंकडे सांगलीची जबाबदारी येईल, असे संकेत यातून मिळत आहेत.