कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून काँग्रेसतर्फे 'यांना' उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेस पक्षाकडून ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उमेदवार असतील अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी आज केली. 

कोल्हापूर - काँग्रेस पक्षाकडून ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उमेदवार असतील अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी आज केली. 

कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. या मेळाव्यास शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे उपस्थित होते. पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाला खासदार संजय मंडलिक यांनी अनुमोदन दिले. यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत मंडलिक गट पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असे यातून स्पष्ट झाले आहे. 

 दरम्यान मेळाव्याच्या प्रारंभी कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांनी दक्षिणमधून तर ऋतुराज पाटील यांनी उत्तर मतदार संघातून लढावे अशी मागणी केली होती. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेच्या सदस्यांना विधानसभेचे तिकीट देण्यास विरोध दर्शिवला होता. यामुळेच सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruturaj Patil contestant from Kolhapur South constituency