प्रो कबड्डीसारखी संधी मिळाली नाही ही खंत 

धोंडिराम पाटील
शनिवार, 27 जून 2020

सांगली ः आटीव, गोळीबंद शरीर. रबरासारखा लवचिक. कबड्डीच्या मैदानावर त्याची पावलं अशी ठरतंच नव्हती. पुण्या, मुंबईच्या मातब्बरांनी त्याला खेळ पाहून अनेक ऑफर दिल्या. मात्र आई वडिलांच्या इच्छेखातर तो सांगलीत राहिला. महानगराच्या झगमगाटात चमकायची संधी येऊनही तो तिकडे गेला नाही. त्याबद्दल नाही, पण कबड्डीच्या आजच्या अवस्थेबद्दल आणि नव्या पिढीतील अनास्थेबद्दल त्याला खंत वाटते. प्रो कबड्डीसारखी संधी आम्हाला मिळाली असती तर आम्ही सोनं केलं असतं, असे शब्द त्याच्या तोंडून आपसूक बाहेर पडतात. अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा राजू आवळे "सकाळ' शी बोलत होता. 

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आमराई उद्यानात तो काम करतो. कमी शिक्षणामुळे आणि आई वडिलांच्या सोबतीनं गड्या आपला गाव बरा म्हणून इथंच राहिला. साधारण नव्वदच्या दशकांत सांगलीत जयमातृभूमी, शिवशक्ती, तरूण भारत, तरूण मराठा, युवक मराठा, संघर्ष, जयभीम, हिंदमाता, सम्राट, आझाद, मिरजेचे भानू तालीम, तसेच माधवनगरचे राणाप्रताप, जयभवानी, बुधगावचे जागृती, बिसूरचे हनुमान अशी मंडळे त्यावेळी महिला-पुरूषांच्या अ व ब अशा दोन टीम मैदानात उतरंवत. त्यात जे मोजके खेळाडू चमकले, लक्षात राहिले त्यात राजू आघाडीवर होते. त्यांचे वरिष्ठ म्हणजे छत्रपती व अर्जून पुरस्कार प्राप्त राजू भावसार व गणेश शेट्टी. त्यांच्यासह पुण्याच्या शांताराम जाधव राजूच्या खेळावर फिदा होते. 

आज मागे वळून पाहताना राजू जुन्या आठवणीत रमतो. रहायचे, खायचे आणि प्रवास खर्चाचे वांदे असताना मुंबईत बक्षिस मिळालेली सायकल चोरीला गेली. त्यावेळी काळजाला झालेल्या जखमा अजून कायम असल्याचे तो पानावल्या डोळ्यांनी सांगतो. सामनावीर आणि स्पर्धावीर म्हणून मिळणारे काही रूपयांतील बक्षिस आज लाखाला भारी आहे, असंही त्याला वाटतं. 

""मी "जयमातृभूमी' चा खेळाडू. ज्येष्ठ नेते व कबड्डीपटू रामभाऊ घोडके यांनी मला "आझाद' कडून संधी दिली. तत्कालीन पालिकेत नोकरी मिळाली. तब्बल दहा वर्षे वेतनाबाबत अन्याय झाला. सध्या समाधानी आहे.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sad thing is that I didn't get a chance like Pro Kabaddi