
यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
झरे (सांगली) : आटपाडी येथे आंब्याच्या बागेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विजबिलांची होळी करुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाला हात लावणाऱ्यांची गय केली जात नव्हती. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा मंत्री यांनी वीजबिल माफीची घोषणा केली आणि आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची फसवणूक केली आहे. म्हणून रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर वीज बिलाची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला आहे.
हेही वाचा - जयंत पाटील यांच्या खेळीने भाजप घायाळ का ? ९ नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल -
दरम्यान शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत वीजबिल आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत, विजबिलांची होळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत महाविकास आघाडी विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, सभापती भूमिका बेरगळ, उपसभापती दादासाहेब मरगळे, विलास कळेबाग, माजी उपसभापती नारायण चवरे, मार्केट समितीचे व्हा. चेअरमन दिलीप खिलारी उपस्थित होते.
संपादन - स्नेहल कदम