Sahyadri Tiger Reserve : 'सह्याद्री'च्या जंगलात वाघांचं नवं राज्य! 'बाजी-हिरकणी'सह 3 जोड्या एकत्र; लवकरच मिळणार 'गोड बातमी', पाहा चांदोलीतील लेटेस्ट अपडेट

Sahyadri Tiger Reserve tiger relocation success : ताडोबा आणि पेंच येथून स्थलांतरित तीन वाघिणींनी सह्याद्री-चांदोली व्याघ्र प्रकल्पात यशस्वीरीत्या स्थिरावत नवीन अधिवास स्वीकारला आहे. त्यामुळे भविष्यात वाघांच्या वाढत्या संख्येची आणि संवर्धनाच्या यशाची आशा निर्माण झाली आहे.
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project

Sahyadri Tiger Reserve tiger conservation project

esakal

Updated on

शिराळा (सांगली) : ‘ताडोबा’-‘पेंच’मधून आणलेले वाघ आता ‘सह्याद्री’च्या घनदाट जंगलात, हिरव्यागार झाडीत आणि नद्यांच्या खोऱ्यांत उत्तमरीत्या रुळताना दिसत आहेत. जिल्ह्याचे वैभव असलेल्या ‘चांदोली-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त दाखल झालेली वाघांची नवी फॅमिली या जंगलाला आपले घर मानू लागली आहे. इथल्या निसर्गाशी आणि वातावरणाशी जुळवून घेत ती पूर्णपणे स्थिरावत असल्याचे गेल्या सहा महिन्यांतील निरीक्षणांतून स्पष्ट झाले (Chandoli National Park relocated tigresses) आहे. त्यामुळे आता या कुटुंबातून ‘गोड बातमी’ कधी मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com