
साईमंदिरात रंगीबेरंगी फुलांची मोहक सजावट केली होती. साईमंदिर परिसरातील महादेव मंदिर, तसेच गुरुस्थान मंदिरातील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शिर्डी ः महाशिवरात्रीनिमित्त साई संस्थानाच्या प्रसादालयात भाविकांना साबुदाणा खिचडी, झिरक व बटाट्याचा शिरा, असा फराळ देण्यात आला. त्यासाठी 15 हजार किलो खिचडी तयार केली होती. त्याचा 60 हजारांहून अधिक भाविकांनी आस्वाद घेतला.
आज पहाटे मंगल स्नानानंतर साईबाबांच्या मूर्तीला श्वेतवस्त्र परिधान करण्यात आले. सोन्याच्या नक्षीदार पत्र्यात मढविलेली रूद्राक्षाची माळ, तसेच बेलाच्या पानांचा हार घालण्यात आला.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफ म्हणाले, विखे पाटील तर आमचेच
साईमंदिरात रंगीबेरंगी फुलांची मोहक सजावट केली होती. साईमंदिर परिसरातील महादेव मंदिर, तसेच गुरुस्थान मंदिरातील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
गुरुस्थान मंदिरात रात्री लघुरुद्र पूजा केली जाते. रात्री सव्वा नऊच्या सुमारास शहरातून बाबांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. गुरुस्थान मंदिरातील लघुरुद्र पूजा पहाटे चार वाजेपर्यंत चालेल, असे सांगण्यात आले.
साई संस्थानच्या प्रसादालयाचे प्रमुख विष्णू थोरात यांच्या माहितीनुसार, आजचा फराळ तयार करण्यासाठी 6300 किलो साबुदाणा, साडेचार हजार किलो शेंगदाणे, साडेतीन हजार किलो बटाटे, एक हजार किलो तूप, दीडशे किलो लाल मिरची, प्रत्येकी साडेचारशे किलो हिरवी मिरची, मीठ व साखरेचा वापर करण्यात आला.