सकाळ माध्यम समूहाची "कोरोना'विषयक जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सामाजिक भान राखत सकाळ वृत्तसमूहातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाविषयक माहिती "सकाळ'मधून देत वृत्तपत्रविक्रेत्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

नगर ः कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेतलेला आहे. त्यातच सकाळ वृत्तसमूहाने सामाजिक भान जपत कोरोनाविषयक जनजागृती मोहीम सुरू केली असून, शहर व परिसरातील वृत्तपत्रविक्रेत्यांना हॅंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, तो रोखण्यासाठी प्रशासनाची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती चांगली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सामाजिक भान राखत सकाळ वृत्तसमूहातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाविषयक माहिती "सकाळ'मधून देत वृत्तपत्रविक्रेत्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

वृत्तपत्रविक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना या विषयी मार्गदर्शन करून त्यांना हॅंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी (ता. 19) पहाटे माळीवाडा बसस्थानक परिसरातील विक्रेत्यांना मार्गदर्शन करून सॅनिटायझर वाटपाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील सर्व भागातील विक्रेत्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Media organized Corona awareness