‘एनआयई’ सभासद नोंदणीस शाळानिहाय प्रारंभ

Sakal-NIE
Sakal-NIE

सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे.

साताऱ्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, नवी मुंबई या ठिकाणी हा उपक्रम होत आहे. सुमारे ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

‘सकाळ एनआयई’च्या वतीने वर्षभरात कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वाचन कौशल्ये, लेखन कौशल्ये, प्राणीमित्रांशी संवाद अशा विषयांवर शाळानिहाय कार्यशाळा, तसेच ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, इको गणेशा, आंतरशालेय नाट्य स्पर्धा, शालेय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

याचबरोबर शैक्षणिक वर्षात ‘सकाळ एनआयई’चे १८ अंक सभासदांना दिले जातात. यात विविध विषयांवरील लेख, गंमतकोडी यांचा समावेश असेल. तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी भेटवस्तू देण्यात येतील. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रायोजक आहेत.

आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात व्हावा, यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सकाळ एनआयई’च्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते ५ या कालावधीत ८३८००९२२११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com