सकाळ स्कूल क्रिकेट लीग; वाचा...काेण काेणाशी कधी भिडणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

क्रिकेटमध्ये उत्सुकता लावणाऱ्या "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'ची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. या स्पर्धेस उद्यापासून (मंगळवार) प्रारंभ हाेत आहे. यामुळे क्रीडारसिकांनी खेळाडूंचे काैशल्य पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

सातारा ः शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिकेटमधील कलागुणांना, कौशल्याला वाव देण्यासाठी येथील व्यावसायिक, उद्योजकांसह मान्यवर पुढे आले आहेत. त्यांनी शहरातील आठ माध्यमिक शाळांमधील संघांचे दातृत्व स्वीकारले आहे. 28 जानेवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत आठ संघ चुरशीने एकमेकांशी लढणार आहेत.
 
शालेय विद्यार्थ्यांतील कुशल क्रिकेटपटू समाजासमोर यावेत, राज्य आणि देशपातळीवरही त्यांचे कौशल्य, त्यांची गुणवत्ता झळकावी, यासाठीच "सकाळ'ने ही स्कूल क्रिकेट लीग यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. क्रिकेटमध्ये उत्सुकता लावणाऱ्या "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'ची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. सातारा शहरातील विविध शाळांमधील क्रिकेटपटूंनी "सकाळ'शी संपर्क साधत कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. दिशा ऍकॅडमी, दिशा स्पोर्टस ऍकॅडमी (वाई) हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. 

असे आहेत संघ व संघमालक 

गुरुकुल स्कूल - राजेंद्र चोरगे (गुरुकुल स्कूल, सातारा), निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल - डॉ. संजय कोरडे (रामचंद्र कोरडे मेमोरियल फाउंडेशन, सातारा), इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल - अस्लमशेठ तांबोळी (हिरा ग्रुप, बाबा नमकिन, सातारा), न्यू इंग्लिश स्कूल - अरुणराव कणसे (कणसे ह्युंदाई, कणसे होंडा, सातारा), पोदार इंटरनॅशनल स्कूल - विजय औताडे (विजय फार्म, सातारा). 
अनंत इंग्लिश स्कूल - संदीप शिंदे, सचिन आगाणे (एस. जी. सी. ग्रुप, सातारा), महाराजा सयाजीराव विद्यालय - मोहित कटारिया (सिटी सेंटर, सातारा), के. एस. डी. शानभाग विद्यालय - मजिद कच्छी (कच्छी प्रॉपर्टीज, सातारा). 

अ गट 
गुरुकुल स्कूल 
इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल 
पोदार इंटरनॅशनल स्कूल 
महाराजा सयाजीराव विद्यालय 

ब गट 
निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल 
न्यू इंग्लिश स्कूल 
अनंत इंग्लिश स्कूल 
के. एस. डी. शानभाग विद्यालय 
 

सकाळ स्कूल क्रिकेट लीग 2020 क्रिकेट संघ 

न्यू इंग्लिश स्कूल ः नेत्रदीप अजय वैद्य (कर्णधार), आर्यन विकास झांजुर्णे, प्रथमेश सोमनाथ जाधव, हर्षवर्धन शैलेश अष्टेकर, अर्थव विनायक कुलकर्णी, समर्थ सुहास चोपडे, रितेश राजेंद्र घोरपडे, ओम संतोष परदेशी, यश दीपक शेलार, ईशान प्रवीणकुमार केंजळे, वरद जयंत मांगलेकर, प्रतीक यशवंतराव होवाळ, जयदीप प्रदीप आढाव, सिद्धांत संदीप म्हस्के.

महाराजा सयाजीराव विद्यालय ः राज प्रदीप जाधव, साहील महेश वाडते, सौमित्र यशवंत करचे, उर्जितसिंह अटलसिंह पवार (कर्णधार), क्षितीज हंबीर मोहिते, विश्‍वविनायक किशोर महापरळे, शंकर भागोजी बावदाने, फरहान जाकिर बागवान, करण राजेंद्र बोबडे, वैष्णव जितेंद्र ढमाळ, प्रसाद दत्तात्रय जाधव, मंदार धनंजय चोपडे, यशराज संतोष खताळ, आदित्य मारुती जानकर, वेदांत विष्णू शिबे, विवेक रामचंद्र देवरे.

पोदार इंटरनॅशनल स्कूल ः साहिल विजय औतडे (कर्णधार), कौशल अरुण बडगावे, मित बिपिन ओसवाल, स्वयंभू सोमनाथ स्वामी, कपिल सांवरमल जांगीड, अथर्व सुजित भोसले, चैतन्य अविनाश खुस्पे, अलोक जयवंत गायकवाड, अथर्व हनुमंत डोईफोडे, सुजय संदीप पवार, अमय अनिल खरात, संग्रामसिंह सुभाष नरळे, हर्षवर्धन अनिल देसाई, अथर्व अनिल कोळी, आदित्य सचिन जाधव, विश्‍वजित हनुमंत पवार.

निर्मला कॉन्व्हेंट स्कूल ः झैद रियाज शेख (कर्णधार), अनिष जिग्नेश शीरसाट, वेदांत युवराज देवडे, पार्थ प्रदीप जाधव, अर्जुन विजय वाघ, आदित्य महेश नलवडे, अजिंक्‍य संतोष शिंदे, मित आनंद मालपानी, स्नेहित मनोज केकडे, युवल समीर गुलाटी, अर्णव गिरीश लाड, ईशान जयंत जाधव, ओंकार रामचंद्र शेळके, प्रणव संतोष कडू, अर्णव सुनील कोळी, वेदांत मंगेश प्रधान. 

हेही वाचा - Video लई भारी...बालसंशोधकांचा रोबोट करणार वाहतूक नियंत्रण
 

के. एस. डी. शानभाग विद्यालय ः आकाश बंडू पांडेकर (कर्णधार), ओम गणेश शिंदे, हर्ष राजेश सोनवले, अथर्व परशुराम पवार, प्रफुल्ल संजय माने, ओम विनायक खटावकर, चिन्मय चंद्रशेखर भुजबळ, साईदत्त विक्रम साबळे, वेदांत संजय शेलार, प्रज्वल संतोष कापसे, ओम सुधाकर केसरकर, सर्वेश रवींद्र बोतालजी, सिद्धांत नरेंद्र लोखंडे, अथर्व केदार कुलकर्णी, सुयोग सुहास जाधव, पियुष केदार जोशी.

गुरुकुल स्कूल ः शार्दूल राकेश फरांदे (कर्णधार), आर्य सुनील जोशी, सिद्धार्थ महेश शितोळे, राहुल सीताराम वाघमळे, आदित्य हणमंत कणसे, प्रथमेश वेळेकर, पार्थ मच्छिंद्र सावंत, नीरज किसन जाधव, अरमान सलाउद्दीन मुल्ला, प्रथमेस दीपक घोरपडे, पियुष सचिन फरांदे, हर्ष संपत जाधव, जय उदयसिंग फडतरे, अल्केश अभिजित होरा, सिद्धेश सतीश गोरे, अद्वैत दीपक प्रभावळकर, शिवम संतोष वैद्य.

अनंत इंग्लिश स्कूल ः मयूर महेश जाधव, सुयोग प्रसाद इंदलकर (कर्णधार), मंदार उत्तरेश्‍वर तारळकर, यशराज बाळकृष्ण घाडगे, रविकिरण रामहरी तांदळे, अथर्व ज्ञानोबा महानवर, यश नीलेश निकम, आबरार इम्रान शेख, क्षितीज प्रमोद बर्गे, सुमेध धर्मदीप सावंत, प्रेम अनिल सुर्वे, चैतन्य शामराव साळुंखे, क्षितीज राकेश सोनटक्के, उत्कर्षा उदय कदम.

इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल ः सईद अरिफ बागवान, साद शफिक बागवान, साद जावेद बागवान (कर्णधार), महंमद नोमन महंमद हुसेन झोजा, यासीर रियाज बागवान, सकलेन सोहेल बन्ने, अथर्व संजय काटेकर, साद अस्पाक सय्यद, झैद जावेद शेख, इस्माईल जमीर सय्यद, महंमद इस्माईल हमिदुल्ला खान, रबील फैय्याज बागवान, सुहान अहमंद मणेर, बिलाल शेख, सोहेल जावेद मुजावर, झैद रियाझ पठाण.

हेही वाचा - वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

सकाळ स्कूल क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक 

28 जानेवारी - सकाळी आठ वाजता ः गुरुकुल स्कूल वि. महाराजा सयाजीराव विद्यालय. 
दुपारी साडेबारा वाजता ः निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल वि. केएसडी शानभाग विद्यालय. 

29 जानेवारी - सकाळी 8.00 वाजता ः पोदार इंटरनॅशनल स्कूल वि. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल. 
दुपारी 12.30 वाजता ः अनंत इंग्लिश स्कूल वि. न्यू इंग्लिश स्कूल. 

30 जानेवारी सकाळी आठ वाजता ः गुरुकुल स्कूल वि. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल. 
दुपारी साडेबारा वाजता ः न्यू इंग्लिश स्कूल विरुद्ध निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल. 

31 जानेवारी - सकाळी आठ वाजता ः अनंत इंग्लिश स्कूल वि. केएसडी शानभाग स्कूल. 
दुपारी साडेबारा वाजता ः पोदार इंटरनॅशनल स्कूल वि. महाराजा सयाजीराव विद्यालय. 

1 फेब्रुवारी - सकाळी आठ वाजता ः न्यू इंग्लिश स्कूल वि. केएसडी शानभाग स्कूल. 
दुपारी साडेबारा वाजता ः इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल वि. महाराजा सयाजीराव विद्यालय.

हेही वाचा - भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम 

2 फेब्रुवारी - सकाळी आठ वाजता ः अनंत इंग्लिश स्कूल वि. निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल. 
दुपारी साडेबारा वाजता ः पोदार इंटरनॅशनल स्कूल वि. गुरुकुल शाळा. 

3 फेब्रुवारी - सकाळी आठ वाजता ः पहिला उपांत्य सामना (अ गटातील प्रथम क्रमांक विरुद्ध ब गटातील द्वितीय क्रमांक ). 
दुपारी साडेबारा वाजता ः दुसरा उपांत्य सामना (ब गटातील प्रथम क्रमांक विरुद्ध अ गटातील द्वितीय क्रमांक).  

4 फेब्रुवारी - दुपारी साडेबारा वाजता ः अंतिम सामना (पहिल्या व दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्यांमध्ये). 

हेही वाचा - पाणी पिकलंया... जलयुक्‍तची पहा अचाट किमया

 

शालेय विद्यार्थ्यांचे वय हे गुणग्राहकतेचे असते. या वयात चैतन्य आणि उत्साह त्यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना खेळात सक्रिय करून, त्यांना प्रत्यक्ष मैदानावर उतरवून त्यांच्यात चैतन्य, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी मी नेहमीच आग्रही असतो. मुलांचे मानसिक संतुलन, प्रकृती सुदृढ राहण्यासाठी त्यांना खेळते ठेवले पाहिजे ही माझी धारणा आहे. मला स्वतःला खेळाची आवड असून, "सकाळ स्कूल क्रिकेट लीग'च्या माध्यमातून मी आणि दिशा ऍकॅडमी (वाई) आणि सातारा संस्थेच्या वतीने माझा सहभाग ठेवून मोलाचे योगदान दिले आहे. या क्रिकेट लीगच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विविध संघांना आपले खेळातील प्रावीण्य सिद्ध करण्याची संधी आम्ही निर्माण करत आहोत. 

प्रा. डॉ. नितीन कदम, संस्थापक - दिशा स्पोर्टस ऍकॅडमी (वाई). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal School Cricket League 2020 Organised In Satara