Sakshi Soundalge from Benadi secures BDS admission at Oxford Dental College, Bengaluru, through the government quota.
esakal
निपाणी :मेढपाळ समाजातील बेनाडीतील कन्या साक्षी काकासाहेब सौंदलगे हिला बंगळुरू येथील ऑक्सफर्ड डेंटल(दंतवैद्यकीय) महा विद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. तिच्या या लख्ख यशामुळे गावासह मेढपाळ समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बेनाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.