Poisoning Case : समता आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणी सचिव, मुख्याध्यापकासह पाच जणांवर गुन्हा

उमदी (ता. जत) समता आश्रम शाळेतील 168 मुलांना खासगी कार्यक्रमात बनविलेले शिल्लक राहिलेले जेवण दिले होते.
Crime
Crimeesakal

जत - उमदी (ता. जत) समता आश्रम शाळेतील 168 मुलांना खासगी कार्यक्रमात बनविलेले शिल्लक राहिलेले जेवण देऊन त्यांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितेस धोका निर्माण केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव, मुख्याध्यापक, अधीक्षक यांच्या सह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

चोवीस तासात समाजकल्याण विभागाने या घटनेचा चौकशी अहवाल सादर केला होता. यावर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या अनुषंगाने उमदी पोलिस ठाण्यात समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संस्थेचे सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तिकार, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, सुरेश चनगोंडा बगली, विकास तुकाराम पवार, अक्कमहादेवी सिद्धाण्णा निवर्गी (रा. उमदी, ता. जत ) या पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उमदी येथील समता आश्रम शाळेत दि. २७ ऑगस्ट रोजी शेजारीच असणाऱ्या मंगल कार्यालयात खासगी कार्यक्रम होता. यामध्ये जेवण तयार करण्यात आले होते. यातील शिल्लक राहिलेले जेवण रात्री आश्रम शाळेतील मुलांना देण्यात आले होते. जेवणानंतर मुलांना जुलाब, उलट्या व अस्वस्थ वाटू लागले.

दरम्यान, त्यांच्यावर माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. या घटनेनंतर सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दायनिधी यांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून चोवीस तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार समाजकल्याण विभागाने चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला असून संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, अशा पाच जणांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com