esakal | Video -कोरोनाबाधीतांच्या जेवणात गाईचे तूप वापरल्यास ते बरे होतील  : संभाजी भिडे 
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji bhide gives tips corona virus

“आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे वय ६० ते ६५ वर्षे होते. मृतांमध्ये तरूणांची संख्या कमी आहे. त्यामुळे तरूण मुलांना खेळण्यासाठी मैदानावर साेडावे. गोमूत्र आणि गायीचे तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा उपयोग करावा.

Video -कोरोनाबाधीतांच्या जेवणात गाईचे तूप वापरल्यास ते बरे होतील  : संभाजी भिडे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - शिवप्रतिष्टानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाबाधीतांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. “गाईच्या तुपाने भरलेले बोट नाकात फिरवले किंवा गोमूत्र प्यायला दिले तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील”, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी भिडे यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हे पण वाचा -  ...आणि लोकांनी कांदे बटाटे दिले फेकून

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले , “आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे वय ६० ते ६५ वर्षे होते. मृतांमध्ये तरूणांची संख्या कमी आहे. त्यामुळे तरूण मुलांना खेळण्यासाठी मैदानावर साेडावे. गोमूत्र आणि गायीचे तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा उपयोग करावा. गाईच्या तुपाने भरलेले बोट नाकात फिरविले किंवा कोरोनाबाधिताला गोमूत्र प्यायला दिले तर कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होतील. अशा रूग्णांच्या खाण्यापिण्यातसुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा”. 

हे पण वाचा - गोष्ट मिरजेतील डॉक्‍टरची,  कोरोनाची... धैर्याची, सबुरीची 

'कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचे मी आयुर्वेदामध्ये वाचले आहे. या जंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचे बोट लावावे. शिवाय त्यांना गोमूत्र प्यायला द्यावे. 

केंद्र आणि राज्य सरकार भगवंताने दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केल्यास हे 
संशोधन आपण पुढील पिढ्यांना देऊ शकू. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे 
संभाजी भिडे म्हणाले.

हे पण वाचा -  कोल्हापुरकर आता मटण मार्केट राहणार बंद पण.... 

यावेळी बोलताना भिडे यांनी इस्लामपुरातील कोरोना बाधितांवर गुन्हा दाखर करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले आहेत. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा”, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

loading image