...आणि लोकांनी कांदे बटाटे दिले फेकून 

The fear of Corona in karad taluka
The fear of Corona in karad taluka
Updated on: 

इस्लामपूर : कोरोना व त्यासंदर्भात अफवांचे पीक आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. परंतु, या अफवांची झळ कराड तालुक्यातील एका कांदा बटाटा व्यापाऱ्याला बसली आहे. इस्लामपूर येथील कोरोनाबाधीत कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या या व्यापाऱ्याने कालवडे (ता. कराड) येथे विकलेले कांदे बटाटे लोकांनी उकिरड्यात फेकून दिले आहेत. या घटनेने कालवडे व बेलवडे येथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

इस्लामपूरच्या कोरोरोग्रस्त कुठुंबीयांना शासनाने होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. मात्र या कुठुंबीयांनी हा सल्ला न ऐकता समाजात फिरत लोकांशी संपर्क वाढवला. शिवाय अनेकांना भोजन दिले. यामुळे अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले. या कुठुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने त्या कुठुंबीयांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेत, अनेकांना होम क्वारंटाईन केले. काहींना विलागीकरण कक्षात ठेवले. या सर्व घडामोडीनंतर अनेक ठिकाणी अफवांचे पीक पसरले आहे. अशीच एक अफवा कराड तालुक्यातील कालवडे येथे पसरली आहे. बेलवडे येथील एका कांदा बटाटे व्यापाऱ्याचे इस्लामपूर कोरोनाबाधी कुटुंबियांशी नातेसंबंध आहेत. तो व्यापारी या कुटुंबियांना भेटायला गेला होता. अशी चर्चा बेलवडेत सुरू झाली. गेल्या चार ते पाच  दिवसापूर्वी त्या व्यापाऱ्याने आपल्या रिक्षामधून त्या परिसरात कांदा बटाटा आणून लोकांना दिला होता. त्या व्यापाऱ्याचे इस्लामपूरशी नातेवाईक कनेक्शन असल्यामुळे तो इस्लामपूर येथे जेवून आल्याची  अफवा उठली आणि ती अफवा कालवडे व बेलवडे परिसरात वार्‍यासारखी पसरली. या अफवेची खातर जमा न करताच  ज्यांनी ज्यांनी त्या व्यापाऱ्याकडून कांदे-बटाटे खरेदी केले होते त्या लोकांनी कोरोणाच्या भीतीने ते सर्व कांदे-बटाटे उकिरड्यात फेकून दिले. काहींनी आपण ते खाल्ले म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र तो व्यापारी खरेच इस्लामपूर येथे गेला होता का ? याची खातरजमा मात्र कोणी केली नाही. या घटनेमुळे आता कालवडे येथे कोणी कोणी कांदा बटाटा खाल्ला,  कोणी नाही याची चर्चा मात्र भीतीदायक वातावरणात जोरदार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com