Sambhaji Bhide Guruji : संभाजी भिडे गुरुजींना कुत्र्याचा चावा; उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
Bhide Guruji : भिडे गुरुजी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सांगलीत सोमवारी रात्री घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला. याबाबत साम टिव्हीने वृत्त दिले आहे.