
सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हापरिषद सदस्यत्वचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे कोकरूड गट सांगली जिल्हा परिषद रिक्त जागेवर ही निवडणूक लागली होती.
सांगली - कोकरूड गण जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत अन्य पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार व सह्याद्री खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख हे बिनविरोध निवडून आले आहेत.
रिक्त जागेवर लागली होती निवडणूक
सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हापरिषद सदस्यत्वचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे त्या रिक्त जागेवर ही निवडणूक लागली होती.यासाठी महाडिक युवा शक्ती मधून अनिल मारुती पाटील (अपक्ष), भाजपा मधून संपतराव गुलाबराव देशमुख, काँग्रेस मधून प्रदीप नारायण धस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून देवेंद्र वसंत धस, शिवसेनेतून राजाराम सदाशिव पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते.
लय भारी ! छंद असावा तर असा; चाैथ्या पिढीलाही तोच नाद...
कै.शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे बंधू संपतराव देशमुख यांना इतर पक्षानी बिनविरोध साठी सहकार्य करावे असे आवाहन भाजपच्यावतीने माजी आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी केले होते. राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्या नुसार सर्व पक्षांच्या उमेदवारांनी नेत्यांशी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार काँग्रेस,अपक्ष, शिवसेना, स्वाभिमानाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने संपतराव देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकर्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.