
Sangli District Cricket Association : सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निर्देशित समितीत आज नाट्यमय घडामोडी घडल्या. सचिव रवींद्र बिनीवाले यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप नेते पृथ्वीराज पवार आणि माजी खेळाडू मारुती गायकवाड यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यातून नवीन पदाधिकारी निवडीसाठी २७ जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली. जयंत टिकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर फटाक्यांची आतषबाजी झाली.