कशी होतेय वाळू चोरी?

Sand theft in the river Sina at Ridhore in Madha taluka
Sand theft in the river Sina at Ridhore in Madha taluka

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : वाळू माफियांना तलाठी, पोलिस, शासनाच्या गाडीचा चालक हप्ते घेऊन मदत करतो, असा आरोप करणारे निवेदन माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना रिधोरे येथील विक्रम विकास महाडीक यांनी दिले आहे. 
माढा तालुक्‍यातील रिधोरे येथील सीना नदीच्या पात्रातून रोज 70 ते 80 ब्रास वाळू चोरीस जात आहे. ग्रामपंचायतीच्या गावठाणात 200 ब्रास वाळू साठा केला, असा उल्लेख अर्जात नमूद केला आहे. त्याचबरोबर दर 10 दिवसाला एका ट्रॅक्‍टरचा तलाठ्याला 10 हजार रुपये, तहसील कार्यालयाच्या चालकाला सात हजार रुपये, पोलिसांना नऊ हजार रुपये हप्ता आहे. बार्शीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या

हेही वाचा : शिक्षक सघांची महामंडळ कोल्हापूरात १९ जानेवारीला सभा
रिधोरेतून रोज बार्शीकडे 15 ते 20 पिकअप
वाहनधारकांकडून तलाठ्याला सात हजार, तहसील कार्यालयाच्या चालकाला पाच हजार तर पोलिसांना सात हजार रुपये हप्ता दिला जात आहे. रिधोरेतून रोज बार्शीकडे 15 ते 20 पिकअप, आठ ते दहा 407 टेम्पो वाळूची वाहतूक केली जात आहे. महसूल कर्मचारी असलेला गाडीचा चालक यात सामील असल्याने या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आपल्या येण्याची पूर्वसूचना मिळत असल्याने आपल्याला हे लोक सापडत नसून सध्या ग्रामपंचायतीच्या गावठाणात असलेला वाळूसाठा ग्रामसेवक व तलाठी यांना माहिती असतानाही ते सांगत नाहीत, असा आरोप महाडिक यांनी केला आहे. आपण तातडीने कारवाई करावी, असे निवेदनात रिधोरे येथील विक्रम महाडिक यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तो अर्ज तहसील कार्यालयात दिल्याची पोचही तक्रारकर्त्याने घेतली असल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली असून या कारवाईकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com