Sangali: ऊस आंदोलन पोलिस गोळीबार; नवव्या स्मृतिदिनी आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस आंदोलन पोलिस गोळीबार

ऊस आंदोलन पोलिस गोळीबार; नवव्या स्मृतिदिनी आठवण

सांगली : उसाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला मोठा इतिहास. झोन बंदी ते एफआरपी आंदोलन... काही वर्षांनंतरही एफआरपीसाठी आंदोलन सुरुच आहेत. ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात चंद्रकांत नलवडे १२ नोव्हेंबर २०१२ रोजी हुतात्मा झाले. या घटनेला नऊ वर्षे पूर्ण झाली. आता ही घटना कुटुंबापुरती राहिली आहे. तरीही त्यांच्या कुटुंबासह आदरांजली वाहण्यासाठी स्वाभिमानीचे संदीप राजोबा यांची उपस्थिती त्या कुटुबांसाठी मन हेलावून टाकणारीच ठरली. शेतकरी संघटनांकडूनही ही घटना विस्मृतीत गेली आहे.

वसगडे येथे ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात चंद्रकांत नलवडे १२ नोव्हेंबर २०१२ रोजी हुतात्मा झाले. घटनेला नऊ वर्षे होऊन गेली. ऊस आंदोलनावेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात नलावडे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. वसगडे परिसरच नव्हे तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस. हीच भळभळती जखम कपाळी घेऊन दरवर्षीप्रमाणे हुतात्मा नलावडे यांच्या घरी जाऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली स्वाभिमानीचे राजोबा यांना अर्पण केली. त्यावेळी त्यांच्या पत्नी सारिकाताई, त्यांच्या मातोश्री छबुताई तसेच चंद्रकांत यांचा मुलगा आदित्य. घटनेच्यावेळी त्यांचे अवघे पाच वर्षे वय होते. आज तो नववीत आहे. मुलगी आकांक्षा आज ती इयत्ता सातवीत आहे. त्यावेळी तिचे वय अवघे तीन वर्षे होते.

हेही वाचा: ‘हर घर दस्तक’ लसीकरणास सहकार्य करा : पालकमंत्री पाटील

या घटनेला उजाळा देताना राजोबा यांनी नमूद केले की, ‘या घटनेवेळी लहान आकांक्षा लेकरांना काही कळतच नव्हतं, की आपल्या घरासमोर का एवढी गर्दी झालीय. ती नुसता धायमोकलून रडणाऱ्या आईकडे, आजीकडे व एकमेकांकडे टकमक बघत होती. श्रद्धांजली वाहण्यासाठी मी घरात गेल्यागेल्या सारिकाताईने एकच प्रश्न केला. बहुतेक आज कोणी येणार नाही, असं मला वाटलं होतं. परंतु स्वाभिमानीचे कार्यकर्ते व आपण नक्की येणार हे ऐकून मन हेलावून गेलं. गेली आठ वर्षे मी न चुकता या दिवशी त्या कुटुंबाला आवर्जून भेट देऊन, त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो.’ यावेळी धन्यकुमार पाटील, शहीद चंद्रकांत यांचा जिवलग मित्र जगन्‍नाथ अर्जुने, संदीप पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात एफआरपीसाठी आजही आंदोलन सुरू आहे. त्यावेळच्या आणि आजच्या आंदोलनातील फरक लक्षात येण्यासारखा आहे. यातील उसासह अनेक आंदोलन कशासाठी असा प्रश्‍न पडतो. भविष्यात आंदोलन कशी असतील हे सांगता येणार नाही. मात्र कायद्यांनी आंदोलन तरी सुरू रहावीत, एवढीच अपेक्षा.

- संदीप राजोबा

loading image
go to top