Satara: ‘हर घर दस्तक’ लसीकरणास सहकार्य करा : पालकमंत्री पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री बाळासाहेब पाटील

‘हर घर दस्तक’ लसीकरणास सहकार्य करा : पालकमंत्री पाटील

कऱ्हाड : कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे, लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘हर घर दस्तक’ ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील ‘हर घर दस्तक’ या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाळासाहेब सूर्यवंशी, भीमराव ढमाले, दिगंबर डांगे, खाशाबा वेताळ, टीम पर्यवेक्षक पी. डी. भोसले, यु. एम. खेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत माने, डॉ. सचिन देवगावकर, एम. बी. सोनावले, यु. आर. शेळके, आशा स्वयंसेविका जब्बीन बागवान, वैशाली लादे, हेमंत कोरोले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: उमरगा शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या

सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘‘देशातील सर्व राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेला आणखी वेग यावा आणि लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून ‘हर घर दस्तक’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लशीची पहिली व दुसरी मात्रा देत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत लस घेतलीच नाही किंवा ज्यांना लशीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, अशा नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.’’

loading image
go to top