फूल है गुलाब का लाखो में, हजारों में..!

रोझ सोसायटी, मराठा समाज संस्थेतर्फे गुलाबपुष्प प्रदर्शन
sangali news
sangali news esakal
Updated on

सांगली : गेली दोन वर्षे खंडित झालेली गुलाबपुष्पांच्या प्रदर्शनाची परंपरा आज पुन्हा सुरू झाली. येथील मराठा समाज संस्थेचा अवघा परिसर गुलाबाच्या ताटव्यांनी फुलून गेला. शेकडो पुष्परचना पाहत ‘काँटों से घिरा रहता है, फिर भी गुलाब खिला रहता है’ असाच भाव जणू आपसुक व्यक्त होत होता. दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज संस्थेच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाने सांगलीकरांच्या मनात घर केले आहे. तब्बल ४४ वर्षे हा आनंदसोहळा सुरू आहे.

आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची पुष्परचनेतून साकारण्यात आलेल्या थीमने गुलाबांच्या रसिकांचे स्वागत होतेय. ग्रीनहाऊस आणि परदेशांतून भारतात येणाऱ्या दुर्मिळ फुलांनी हा परिसर आणखी दोन दिवस बहरणार आहे. २५ ते ३० प्रकारचे मोहक गुलाब पाहण्याची संधी साधलीच पाहिजे. सोबतच जर्बेरा, ऑर्चिड, शेवंतीच्या शेकडो पुष्परचना मन वेधून घेत आहेत.

परदेशांतून भारतात येणारी सिम्बिडियम, लियाट्रस, एशियाटिक, स्लोसिया, डायड्रांजिया, ट्युलिप्स, प्रोटीय अशा फुलांच्या प्रजाती दाखल झाल्या आहेत. शोभेची झाडे, रंगीत पानांची झाडे, वेलींचे नाना प्रकार आहेतच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील वाहनांची धूळ, गोंगाटाचा हा प्रदेश आता गुलाबमय झाला आहे.

रोझ सोसायटीचे सचिन प्रकाश चव्हाण, मराठा समाज संस्थेचे अभिजित पाटील, एस. आर. जगदाळे, अजित पाटील, प्रकाश मद्वाण्णा, प्रकाश चव्हाण, अतुल दप्तरदार, डॉ. पद्मजा चौगुले संयोजन करत आहेत. देशात ७ फेब्रुवारीला ‘रोझ डे’ (गुलाब दिवस) साजरा केला जातो. प्रदर्शनात ग्रीनहाऊसमधील २५ ते ३० प्रकार आहेत.

थीम ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा’ची

प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. या संकल्पनेवर पुष्परचना केंद्रस्थानी आहे. मराठा समाज संस्थेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहे. हा योगायोग साधत पुष्परचना साकारल्या आहेत. गुलाबाच्या फुलांमधील युवतीसमवेत ‘सेल्फी तो बनता है...!’ डिश गार्डन, बोन्साय डिस्ल्पे पाहिला की, बोटे मोबाईल कॅमेऱ्याकडे वळतातच. हे पाहण्यासाठी सांगलीकरांची उपस्थितीही लक्षवेधी होती. घरातील गार्डन शॉपीही प्रदर्शनात सजली आहे.

स्‍पर्धेत घोडावत ग्रुप श्रीवर्धन बायोटेकची बाजी

पुष्प मांडणी - संजय घोडावत ग्रुप, श्रीवर्धन बायोटेक, अथर्व रोझ नर्सरी (पुणे)

किंग ऑफ द शो - संजय घोडावत ग्रुप

क्विन ऑफ द शो - श्रीवर्धन बायोटेक

प्रिन्स ऑफ द शो - पल्लवी पांडेकर

प्रिन्सेस ऑफ द शो - पुणे महानगरपालिका

ग्लॅडिएटर - संजय घोडावत ग्रुप, संतोष माईणकर, दादासाहेब पाटील

गुलाब (ग्रीन हाऊस)- कुंडल वन विभाग, श्रीवर्धन बायोटेक, श्रीवर्धन बायोटेक

जर्बेरा - श्रीवर्धन बायोटेक, संजय घोडावत ग्रुप, श्रीवर्धन बायोटेक

पुष्परचना - प्रियंका झाडबुके, शरयू पवार, चैताली चौगुले, रसिका पाटील, सरोज पेठे

१५ वर्षांच्या आतील - आंनंद सावंत, सान्वी झाडबुके, उमा शिंदे, यश दफ्तरदार, रमा शिंदे

बालक गट - देवराज सदाकळे, आराध्य गुमाजे, महमंद पटवेगार, अनिश रजपूत, सर्वेश क्षीरसागर

मूकबधिर - साक्षी लोहार, आफरीन पटेल, सिद्धार्थ कलगुटगी, रोहित शिंदे, शैलेश तुळसे

फुलांची रांगोळी - सुप्रिया चौगुले, समृद्धी डिगे, सारिका काब्रा, आसावरी करवंजे, कपिला पाटील

बोनसाई - सुमराज चोपडे, संतोष हिंगमिरे

डिश गार्डन - रूपाली दांडेकर, डॉ. अर्चना जाधव, सरोज पेठे, डॉ. नयना पाटील

फ्लोरिस्ट स्पर्धा - अलंकृत इव्हेंट, द आरंभ इव्हेंट

टेरारियम - सारिका काबरा, संजय होम गार्डन, हेमलता त्रिपाठी

जगभरात शंभरवर प्रजाती

गुलाब ‘Rosaceae’ कुटुंबाशी संबंधित एक कोमल फूल आहे. याचे वैज्ञानिक नाव ‘रोझ’ आहे. गुलाब दिसण्यात खूप सुंदर असतो. हे फूल लाल, गुलाबी आणि काळ्या रंगाचा समावेश आहे. परंतु भारतात लाल गुलाब मोठ्या प्रमाणात आढळतो. गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंनी उघडलेल्या असतात. संपूर्ण झाड काटेदार व सदाबहर असते. जगभरात फुलांच्या शंभरहून अधिक प्रजाती आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com