esakal | बेडकिहाळ येथे ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत सांगलीचा मुलगा ठार

बोलून बातमी शोधा

sangalis boys dead in accident belgaum}

सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात बेडकिहाळ सर्कल स्वागत कमानीजवळ झाला

paschim-maharashtra
बेडकिहाळ येथे ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत सांगलीचा मुलगा ठार
sakal_logo
By
गजानन पाटील

बेडकिहाळ : ट्रॅक्टर-दुचाकी धडकेत मुलगा ठार झाला. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात बेडकिहाळ सर्कल स्वागत कमानीजवळ झाला. सत्यम नायकू सूर्यवंशी (वय १३, रा. येळावी, जि. सांगली) असे मयत बालकाचे नाव आहे. तो मामासोबत दुचाकीवरून गेला असता हा अपघात झाला.


याबाबत अधिक माहिती अशी, बेडकिहाळ येथील देसाई मळ्यातील युवक अमर देसाई हा आपल्या बहिणीचा मुलगा सत्यम सूर्यवंशी याला घेऊन दुचाकीने (एमएच ०९ एफएच  ९७०१) बेडकिहाळ सर्कल परिसरात असलेल्या आरओ प्लांटचे  फिल्टर केलेले पाणी आणण्यासाठी गेला होता. पाणी घेऊन परत येत असताना  मोरब येथील ट्रॅक्टर चालक  बाळू चौगले हा ट्रॅक्टरने
(केए २३ टीबी ८११०) ऊस भरून बेडकिहाळ कारखान्यास येत होता. पाण्याचे कॅन हल्ल्याने सावरत असताना सत्यम खाली पडला. ट्रॅक्टरचे मागील चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. घटनास्थळी सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी,  ए. एस. देवर,  जमकोळी, एम. एस. अक्कोळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

सत्यमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सदलगा येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

एकुलत्या सत्यमच्या जाण्याने हळहळ

सत्यम हा आई-वडिलांना एकुलता होता. शिक्षणासाठी तो आजोळी होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
   

  संपादन - धनाजी सुर्वे