esakal | बिगर सभासदांनाही संगम सहकारी साखर कारखाना देणार साखर | Sugar
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Patil
बिगर सभासदांनाही संगम सहकारी साखर कारखाना देणार साखर

बिगर सभासदांनाही संगम सहकारी साखर कारखाना देणार साखर

sakal_logo
By
आनंद शिंदे

संकेश्वर - संगम सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी दिवंगत मल्हारगौडा पाटील, एस. एस. महाजनशेट्टी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. त्यांच्या मागे त्यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी कटीबध्द आहोत. गतवर्षी पहिला प्रायोगिक हंगाम यशस्वी झाल्याने यंदा दुसरया हंगामासाठी जोमाने कामाला लागलो आहोत. परिसरातील शेतकरी बांधवही आम्हाला सहकार्य करीत आहेत. यंदाच्या हंगामात सभासदांसह उसपुरवठा करणारया बिगर सभासदांनाही सवलतीच्या दरात साखर उपलब्ध करून देणार आहोत. यंदा कारखान्याचे तीन लाख मे. टन उसाचे गाळप उद्दीष्ट असल्याची माहिती हिडकल डॅम येथील संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.

हेही वाचा: मोर्चा पुढे गेला कि, मागे दुकानदारांचा व्यापार सुरु; अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद

ते आज (ता. ११) कारखान्याच्या वार्षिक ऑनलाईन सभेत बोलत होते. संचालक शशिकांत नाईक यांनी स्वागत केले.

पाटील म्हणाले, यंदा कारखान्यातर्फे तोडणी-ओढणीची सोय केली आहे. सभासदांनाही सहकार्य करून आपला उस संगमला पाठवावा. उसाचे बिल परिसरातील इतर कारखान्यांप्रमाणे देऊ.

विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापकीय संचालक के. सी. श्रीनिवास यांनी केले. सभेस उपाध्यक्ष शंकर भांदुर्गे, अण्णासाहेब पर्वतराव, बी. एम. पाटील, अर्जुन पाटील, सुभाष पाटील, कुणाल पाटील, शिवप्पा घस्ती, रवींद्र पाटील, बसवराज बागलकोटी, सुरेश शेट्टीमनी, पवन पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक बसगौडा पाटील यांनी आभार मानले.

loading image
go to top